मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : दसरा मेळाव्याला मुंबईत दाखल होणार १० हजार वाहने, ठाकरे-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन

Dasara Melava : दसरा मेळाव्याला मुंबईत दाखल होणार १० हजार वाहने, ठाकरे-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन

Oct 04, 2022, 07:42 PM IST

    •  उद्धव ठाकरे गट (uddav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. यासाठी दसरा मेळावा (Dasara Melava )चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक गर्दी जमा करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत.
ठाकरे-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन

उद्धव ठाकरे गट(uddav Thackeray) आणिमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगटाकडून अधिकाधिकशिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. यासाठी दसरा मेळावा (Dasara Melava )चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक गर्दी जमा करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत.

    •  उद्धव ठाकरे गट (uddav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. यासाठी दसरा मेळावा (Dasara Melava )चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक गर्दी जमा करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत.

देशभरात बुधवारी विजयादशमी दसरा साजरा केला जाणार आहे, मात्र शिवसेनेतील दोन गटांना हीशक्ति प्रदर्शनाची चांगली संधी आहे. उद्धव ठाकरे गट (uddav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाकडून अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. यासाठी दसरा मेळावा (Dasara Melava) चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक गर्दी जमा करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. या मेळाव्यासाठी इतकी तयारी झाली आहे की, १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. यामध्ये ६ हजार सरकारी आणि खासगी बसेस सामील आहेत. त्याशिवाय ३ हजार कार मुंबईत येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

शिवसेनेच्या जवळपास ६० वर्षाच्याइतिहासात हे पहिल्यादांच घडले आहे की, पक्षाचे दोन दसरा मेळावे होत आहेत. यावेळी गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाने लोकांना सभास्थानी आणण्यासाठी जवळपास १८०० सरकारी बसेस बुक केली आहेत. यासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १८०० बसेस बुक केल्या होत्या. त्याचबरोबर रेल्वे व ३ हजार खासगी वाहने बुक केली आहेत. एकनाथ शिंदे गटाची रॅली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत आहे. यामध्येएकते दीड लाख लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

उद्धव गटाकडूनही १४०० खासगी बसेस बुक -

शिंदे गटातील आमदार व मंत्री मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी मागील १५ दिवसांपासून जिल्हा व तालुक्यांचे दौरे करत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी रहाण्याची व भोजण्याची व्यवस्था केली आहे. शिंदे गटाकडून बसेस बुकींगसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडूनही १४०० खासगी बसेस बुक केल्या आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात शिवसेना शाखा प्रमुख,नगरसेवकांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी आपल्या खर्चाचून कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी आणाले. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड वरून मिनी बस, टेंपो ट्रॅव्हलर, सेव्हन सीटर कार सारखी वाहने मोठ्या संख्येने मेळाव्याला येणार आहेत.

मुंबई १० हजार गाड्यांचे पार्किंग कोठे?

महाराष्ट्र सरकारच्या बसेसचे २४ तासांसाठी कमीत कमी भाडे १२ हजार रुपये आहे. २४ तासानंतर महामंडळ ५६ रुपये प्रति किलोमीटर शुल्क आकारणार आहे. म्हटले जात आहे की, बांद्रा-कुर्ला परिसरात दोन मैदानांवर १-१ हजार वाहने आणि सोमैया मैदानात ७०० ते ९०० वाहने पार्क केली जाणार आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने नियमित वाहनांची संख्या कमी असणार आहे. पार्किंग जागा संपल्यानंतर आदेश देण्यात आला आहे की, शिवसैनिक आपली वाहने सर्विस रोडच्या कडेला ईस्ट-वेस्ट हायवे वर अशा प्रकारे पार्क करू शकतात की, वाहतुकीला बाधा येणार नाही.