मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RSS Vijyadashami : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते संघाच्या दसरा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित

RSS Vijyadashami : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते संघाच्या दसरा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित

Oct 04, 2022, 06:36 PM IST

    • यंदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना प्रमुख अतिथी म्हणून  आमंत्रित करण्यात आले आहे.
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

यंदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

    • यंदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना प्रमुख अतिथी म्हणून  आमंत्रित करण्यात आले आहे.

नागपूर–मराठा आंदोलन वएसटी कर्मचारी संपामुळे चर्चेत आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सध्या वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धी झोतात आले आहेत. सदावर्ते यांना यंदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. एसटी संपाच्या दरम्यानअ‍ॅड. सदावर्ते यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करत गांधीजींवर टीका केली होती.आता संघाच्या कार्यक्रमासाठी त्यांनाआमंत्रण देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

नागपुरमधील रेशीमबागेत दरवर्षी विजयादशमी दसऱ्यानिमित्त आरएसएसचे संचलन तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम असतात. यंदाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाप्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. विजयादशमी निमित्ताने नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाकडे अवघ्या देशाचे लक्ष असते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात गुणरत्न सदावर्ते यांनी'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या स्थापनेवेळी सदावर्तेंनीजय श्रीराम अशी घोषणा दिली होती. महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसे याच्या नावाचा त्यांनी'गोडसेजी' असा उल्लेख करत गांधीजींवर टीका केली होती. तसेच सदावर्ते म्हणाले होते की, गांधीजींनी शेवटच्या क्षणी‘हे राम'म्हटलंच नव्हते. हे गोडसेजींनी कोर्टात सांगितल्याचे सदावर्ते म्हणाले होते.

या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्ते यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांशी विशेष जवळीकवाढल्याची चर्चा आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या