मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde speech : बीकेसी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यानच कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ;अनेक खुर्च्या रिकाम्या

Eknath Shinde speech : बीकेसी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यानच कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ;अनेक खुर्च्या रिकाम्या

Oct 06, 2022, 01:29 AM IST

    • CM Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसाऱ्या मेळव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तब्बल १ तास २८ मिनिट त्यांनी भाषण केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोषात तयारी केली होती. शिंदे यांचे भाषण सुरू होण्या आधी भरलेले मैदानातून त्यांचे भाषण सुरू होताच रिकामे होत होते. भाषण सुरू असतांनाच अनेक कार्यकर्ते हे बाहेर पडल्याने अनेक खुर्च्या या रिकाम्या पडल्या होत्या.
रिकाम्या असलेल्या खुर्च्या

CM Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसाऱ्या मेळव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तब्बल १ तास २८ मिनिट त्यांनी भाषण केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोषात तयारी केली होती. शिंदे यांचे भाषण सुरू होण्या आधी भरलेले मैदानातून त्यांचे भाषण सुरू होताच रिकामे होत होते. भाषण सुरू असतांनाच अनेक कार्यकर्ते हे बाहेर पडल्याने अनेक खुर्च्या या रिकाम्या पडल्या होत्या.

    • CM Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसाऱ्या मेळव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तब्बल १ तास २८ मिनिट त्यांनी भाषण केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोषात तयारी केली होती. शिंदे यांचे भाषण सुरू होण्या आधी भरलेले मैदानातून त्यांचे भाषण सुरू होताच रिकामे होत होते. भाषण सुरू असतांनाच अनेक कार्यकर्ते हे बाहेर पडल्याने अनेक खुर्च्या या रिकाम्या पडल्या होत्या.

मुंबई : मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना शिंदे यांनी अनेक आरोप केले. दरम्यान या मेळाव्यासाठी शिंदे गटातर्फे जल्लोषात तयारी करण्यात आली होती. अनेक बस मधून राज्यभरतून कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर होता. मात्र, शिंदे यांचे भाषण लांबल्याने अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच निघून गेल्याने मैदान रिकामे पडले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण तब्बल १ तस २८ मिनिट चालले. भाषणाच्या सुरुवातीला लिहून आणलेल्या कागदावरून त्यांनी भाषण वाचून दाखवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर लांबलेल्या त्यांच्या भाषणामुळे अनेक कार्यकर्ते हे भाषण सुरू असतांनाच बाहेर पडले. यामुळे मोठ्या प्रमाणणात लावलेल्या खुर्च्या या रिकाम्या पडल्या होत्या. शिंदे यांच्या मेळाव्यासाठी तब्बल ३ हजार एसटी बस मधून कार्यकर्ते हे मुंबईला आले होते. सुरवातीला अनेक कार्यकर्ते हे जागा नसल्याने परत गेले होते. विशेष गाड्यांमधून आणलेल्या या कार्यकर्त्यांची विशेष बडदास्त ठेवली गेली होती. त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची देखील सोय करण्यात आली होती.

<p>भाषण सुरू असताना उपस्थित राहिलेले मोजकेच कार्यकर्ते&nbsp;</p>

शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेसाठी अनेक नागरिक हे सकाळपासून हे मैदानात आले होते. त्यामुळे अनेक नागरिक हे कंटाळले होते. माध्यमांच्या प्रतिनिधीनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले की कुणाच्या सभेला आला आहात, याचे उत्तर देखील त्यांना देता आले नाही. यामुळे सकाळपासून बसलेले अनेक नागरिक हे कंटाळले. मुख्यमंत्री यांचे भाषण उशिरा सुरू झाल्याने तो पर्यन्त त्यांचा बसण्याचा धीर हा टिकून राहिला नाही. त्यांचा संयम सुटल्याने अनेक नागरिक हे मैदानातून उठून बाहेर पडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पण, त्यांना कुठल्याची प्रकारची दाद न देता बाहेर गावरून आलेले अनेक जण हे मैदानाबाहेर पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच ओस पडले होते.

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा