मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde : एका पक्षाला अध्यक्ष मिळेना तर दुसऱ्या पक्षाला अध्यक्ष आहे पण पक्षच उरला नाही; शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

CM Eknath Shinde : एका पक्षाला अध्यक्ष मिळेना तर दुसऱ्या पक्षाला अध्यक्ष आहे पण पक्षच उरला नाही; शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Oct 06, 2022, 01:30 AM IST

    • CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांची चहावाला म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांनी कॉंग्रेसला देखील लक्ष केले.
एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांची चहावाला म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांनी कॉंग्रेसला देखील लक्ष केले.

    • CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांची चहावाला म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांनी कॉंग्रेसला देखील लक्ष केले.

मुंबई : बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अनेक आरोपांचा समाचार घेतला. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना चहावाला म्हणून हिंवणाऱ्यांचा देखील समाचार घेतला.उद्धव ठाकरे यांना लक्ष करत शिंदे म्हणाले, मोदी यांनी इतिहास घडवला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे परंपरागत साम्राज्य नष्ट केले आहेत. त्यांची चहावाला म्हणून खिल्ली उडवता. अरे आज त्यांना विरोध करणाऱ्या पक्षाला अध्यक्ष मिळेनासा झाला आहे. आणि इकडे पक्षाचा अध्यक्ष आणे पण पक्षच नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या गटावर शिंदे यांनी निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

एकनाथ शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा डंका संपूर्ण जगामध्ये वाजवला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती महाराष्ट्रात येतात येथील मिरवणुकीत सामील होतात हे मोदी यांच्या प्रतिभेमूळे शक्य झाले आहे. मोदी ज्या देशात जातात तेथे आपली भुरळ घालतात. तुम्हाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. मी इंदिरा गांधीला पण मानत होतो. त्यांचाही मी अदर करायचो. इंदिरा गांधी देखील कुठल्या पक्षाची नाही पण ते या देशाची प्रधानमंत्री होत्या. पण आता मोदींनी जगावर भुरळ घातली आहे. जेव्हा जगभर कोरोनाचे संकट होते तेव्हा आपल्या देशातून इतर देशांना मदत गेली. यापूर्वी कधी असे पाहिले होते का ? राम मंदिराचा मुद्दा तडीस नेऊन बाळासाहेबांचे स्वप्न कोणी पूर्ण केले ? बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच स्वप्न मोदीजी आणि अमित शहा यांनी पूर्ण केले, असे देखील शिंदे म्हणाले.

अनेक वेळा पक्षातला कार्यकर्ता पदाधिकारी मोठा केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या सोबत राहून चांगले काही केले की ते तुम्हाला खपत नाही. तुम्हाला ते बघवत नाही. मी एवढेच सांगतो की शिवसेनेचा कार्यकर्ता हा नौकर नाही. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि याने शिवसेना मोठी केलेली आहे. मला मोदी यांच्या हस्तक म्हणतात, पण तुम्हीच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसचे हस्तक झाले आहात, असा आरोपही शिंदे यांनी केला.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या