मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Car Accident : टायर फुटल्यानं भरधाव कार झाडाला धडकली; प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू, यवतमाळमध्ये शोककळा

Car Accident : टायर फुटल्यानं भरधाव कार झाडाला धडकली; प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू, यवतमाळमध्ये शोककळा

Nov 02, 2022, 10:09 AM IST

    • Car Accident : डॉक्टर बरलोटा पती-पत्नी हे तेलंगणातील हैदराबाद-निर्मल या महामार्गावर कारनं प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कारचं टायर फुटलं आणि कार झाडाला जाऊन धडकली.
Car Accident In Telangana (HT)

Car Accident : डॉक्टर बरलोटा पती-पत्नी हे तेलंगणातील हैदराबाद-निर्मल या महामार्गावर कारनं प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कारचं टायर फुटलं आणि कार झाडाला जाऊन धडकली.

    • Car Accident : डॉक्टर बरलोटा पती-पत्नी हे तेलंगणातील हैदराबाद-निर्मल या महामार्गावर कारनं प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कारचं टायर फुटलं आणि कार झाडाला जाऊन धडकली.

Car Accident In Telangana : यवतमाळमधील प्रसिद्ध प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा तेलंगणात झालेल्या कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेखा बरलोटा या यवतमाळमधील प्रसिद्ध रोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या निधनानं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय या घटनेनं हैदराबादेतील डॉक्टर्स असोसिएशननंही शोक व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा हे एका कारमधून हैदराबाद ते निर्मल या मार्गावर प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कारचं टायर फुटल्यानं कार रस्त्याच्या बाजूला लांब जाऊन पडली. याशिवाय कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला आदळल्यानं त्यात सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय पीयूष बरलोटा यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत.

डॉक्टर बरलोटा हे आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह तेलंगणात फिरायला गेले होते. त्यानंतर ते हैदराबादहून यवतमाळला परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच काही स्थानिकांनी जखमींना बाहेर काढलं, त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु सुरेखा यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या निधनानं यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा