मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्राच्या इज्जतीचं अपहरण करणारे गुजरातला सोन्यानंच का मढवत नाही?, ठाकरेंचा सरकारवर घणाघात

महाराष्ट्राच्या इज्जतीचं अपहरण करणारे गुजरातला सोन्यानंच का मढवत नाही?, ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 02, 2022 09:50 AM IST

Saamna Editorial : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प सातत्यानं राज्याबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

Udhhav Thackeray vs Ekanth Shinde
Udhhav Thackeray vs Ekanth Shinde (HT)

Udhhav Thackeray vs Ekanth Shinde : महाराष्ट्रातून चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनातून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र हा आपल्या पायावर आणि हिम्मतीवर उभा आहे. गुजरातच्या पलीकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाहीये. महाराष्ट्राच्या इज्जतीचं अपहरण करणारे गुजरातला सोन्यानं का मढवत नाहीत?, रुपयातील ८० पैसे गुजरातला आणि २० पैसे बाकी राज्यांना दिले जात असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सब का साथ, सब का विकास' या घोषणेचा फोलपणा समोर येतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आल्यानं राज्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. जवळपास दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं या धक्कानं अजून मराठी माणूस सावरलेला नसतानाच २२ हजार कोटींचा टाटा-एअरबस हा प्रोजेक्टही गुजरातच्या वडोदऱ्यात गेला. राज्यात मिंधे सरकार आल्यापासूनच प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. हे प्रकल्प कर्नाटक, झारखंड, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये गेलेले नाही तर मोदी-शहांनी हे ठरवून गुजरातमध्ये नेले आणि या किडनॅपिंगवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिठाची गुळणी करत शांत बसलेले आहेत, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपच्या शीर्ष नेत्यांसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करतायंत- ठाकरे

वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीचा प्रकल्प असो की बल्क ड्रग प्रकल्प. यांसाठी २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवले होते. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्राला कंगाल करून अस्मिताहीन करण्यासाठीच हे सरकार स्थापन झाले आहे. टाटांनी आजपर्यंत त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली. वेदांता प्रकल्पही राज्यात होणार होता. परंतु केसानं गळा कापावा, तसा काहीसा प्रकार राज्यासोबत घडला आहे. आणि राज्याचे नाकार्ते उद्योगमंत्री आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे

गुजरातला मालामाल करण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्रीपद...

महाराष्ट्राची लूट करून गुजरातला मालामाल करण्यासाठी मोदी-शहांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. प्रत्येक गुंतवणूक आपल्याच राज्यात हवी, हा मोदी-शहांचा अट्टहास संघराज्य व्यवस्थेला बाधा आणणारा आहे. विदेशातील कोणताही पाहुणा आला की त्याला गुजरातेतील झोपाळ्यात झुलवायचे, बाकी देश काय कचरा आहे का?, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, असं सेनापती बापट सांगून गेलेत. आता राज्याला या मिंध्यांपासून वाचवायला हवं, असंही ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

IPL_Entry_Point