मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : गट शेतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले त्यासाठी नवीन योजना आणणार

Devendra Fadnavis : गट शेतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले त्यासाठी नवीन योजना आणणार

Mar 12, 2023, 04:52 PM IST

  • Devendra fadnavis on group farming : भविष्यात गटशेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis on group farming : भविष्यात गटशेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्रफडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणारअसल्याचेहीफडणवीस म्हणाले.

  • Devendra fadnavis on group farming : भविष्यात गटशेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर, आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्याची क्षमता तयार होते. त्यामुळे भविष्यात गट शेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणारअसल्याचेही फडणवीस म्हणाले. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा २०२२ चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीसांनी पानी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा बेसुमार वापर होत असल्यानं आपल्या काळ्या आईची शक्ती जवळपास संपल्यात जमा आहे. यासाठी आता विषमुक्त व शाश्वत शेती काळाची गरज झाली आहे. गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली आहेत. यासाठी शेतीत बदल आवश्यक झाला आहे. दुसरीकडे रासायनिक अन्न खाल्ल्याने कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचं असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

 

फडणवीस म्हणाले की, नापीक असलेली जमीन आम्हाला द्या. त्याचा आम्ही शेतकऱ्यांना सलग ३० वर्षे मोबदला देऊ. त्यानंतर ती शेती शेतकऱ्यांना परत देऊ, असेही फडणवीस म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा