मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३० लाखांच्या खंडणीची मागणी

Vasant More : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३० लाखांच्या खंडणीची मागणी

Mar 07, 2023, 11:32 AM IST

  • Vasant More son Rupesh More got threat : मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या नावाचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

Crime

Vasant More son Rupesh More got threat : मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या नावाचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

  • Vasant More son Rupesh More got threat : मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या नावाचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या नावाचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर त्यांना तब्बल ३० लाखांची खंडणी देखील मागीतल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. या पूर्वी देखील रुपेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

वसंत मोरे ही पुण्याचे मनसेचे नेते आहेत. तसेच माजी नगर सेवक देखील आहेत. सध्या ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रुपेश याला गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. रुपेश याच्या नावाचे बनावट मेरेज सर्टिफिकेट बनवून रुपेश याला अल्पिया शेख या महिलेच्या नावाने मेसेज करून तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मेरेज सर्टिफिकेट औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीने काढण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा