मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : आरएसएस ही मूलतत्त्ववादी, फॅसिस्ट संघटना; राहुल गांधी यांची जहरी टीका

Rahul Gandhi : आरएसएस ही मूलतत्त्ववादी, फॅसिस्ट संघटना; राहुल गांधी यांची जहरी टीका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 10:22 AM IST

Rahul Gandhi on RSS : राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी आरएसएसला फॅसिस्ट म्हटले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही मूलतत्ववादी आणि फॅसिस्ट संघटना आहे. आरएसएसने देशातील सर्व स्वायत्त संस्थांवर कब्जा केला आहे. यामुळे भारतातील लोकशाही ही धोक्यात आली आहे, असा घाणाघात कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहे. ते लंडनमधील चथम हाऊस येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जहरी टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, भारतातील लोकशाहीचे स्वरूप बदलले आहे. त्याचे कारण म्हणजे आज आरएसएसने देशातील सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. कारण आरएसएस ही संघटना मूलतत्ववादी आणि फॅसिस्ट आहे. भारतात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची परिस्थिती देखील वाईट आहे. भारतीय लोकशाहीला ही बाब घातक आहे. भारतातील विविध संस्थांवर आरएसएस ने कब्जा केल्याने धक्का बसला आहे. माध्यमे, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग यांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहेत, असे देखील राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, जा या स्वायत्त संस्थाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे. माझ्या फोन पेगासस द्वारे टॅप करण्यात आले. गुप्तचर यंत्रनेद्वारे आमच्यावर पाळत ठेवली जात आहे. विरोधकांवर खटले दाखल केले जात आहे. त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे सत्र सुरू आहे, असे देखील ते म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग