मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  China India News : चायनीज मोबाइल वापरणे टाळा; गुप्तचर यंत्रणांनी जवानांच्या कुटुंबांना केले सतर्क

China India News : चायनीज मोबाइल वापरणे टाळा; गुप्तचर यंत्रणांनी जवानांच्या कुटुंबांना केले सतर्क

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 06:36 AM IST

China India News : जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज मोबाइल वापरणे टाळावे अशा सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत. कारण, चीनी फोन मध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत.

China India News
China India News

China India News : भारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशात संघर्षाची परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासूण निवळलेली नाही. दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहेत. असे असतांना सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना चीनी फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण या चीनी फोन मध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. सैन्य गुप्तचर यंत्रणांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शत्रूराष्ट्राकडून फोन घेण्यास मनाई केली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या सूचना या साठी दिल्या गेल्या आहेत करण की चीनी फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत. भारतीय बाजार पेठेत विवो, ओप्पो, शाओमी, वन प्लस, ऑनर, रियल मी, जेडटीई, जियोणि, आसुस आणि इनफीनिक्स या सर्व चायनीज कंपन्या आहेत.

या पूर्वी देखील सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाइल आणि फोन आणि काही अप्लीकेशन सुरक्षा यंत्रणांनी लष्करी अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून काढून टाकले आहेत. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रांनी जवानांच्या कुटुंबीयांना देखील चीनी फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये भारत आणि चीनी सैनिका दरम्यान झालेल्या झटपतीत भारतातचे २० तर चीनचे ४० सैनिक ठार झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे कॉँग्रेसचे खासदार निनोंग ईरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात चीनी द्वारे निर्मित सीसीटीव्हीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. निनोंग ईरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी घरी लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे हे चीन निर्मित नसावे किंवा त्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी केली आहे. या साठी त्यांनी जनजागृती अभियान देखील सुरू केले आहे. ते म्हणाले की डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने स्वदेशी निर्मित क्लाऊड स्टोरेज यंत्रणा तयार करावी अशी देखील मागणी केली आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग