मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manik Saha : त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी माणिक साहा यांची फेरनिवड, ८ मार्चला शपथविधी

Manik Saha : त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी माणिक साहा यांची फेरनिवड, ८ मार्चला शपथविधी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 06, 2023 11:19 PM IST

त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हामाणिक साहा यांची निवड झाली आहे.सोमवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

माणिक साहा
माणिक साहा

ईशान्येकडील मेघालय, नागालँड व त्रिपुराच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा माणिक साहा यांची निवड झाली आहे. सोमवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची नेतेपदी निवड करण्यात आली. लवकरच ते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. ८ मार्चला साहा यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ६० जागांसाठी झालेल्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ३२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्याचा मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला एक जागा मिळाली. ४२ जागा लढवणाऱ्या टिपरा मोथा पक्षाने १३ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

बुधवारी नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची मुख्यमंत्री निवडीसाठी सोमवारी बैठक झाली. आमदारांच्या या बैठकीत माणिक साहा यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. आगरतळा येथे झालेल्या या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांव्यतिरिक्त भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा, माणिक साहा, भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी आणि केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मेघालय आणि नागालँड आणि बुधवारी त्रिपुराच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

IPL_Entry_Point