मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : राज्याला अवकळीचा फटका; पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Maharashtra Weather : राज्याला अवकळीचा फटका; पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 08:08 AM IST

Unseasonal Rain hits state : राज्याला सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांचे झालेले नुकसान.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांचे झालेले नुकसान.

Unseasonal Rain hits state : राज्याला सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. धुळ्यात झालेल्या गारपीटीमुळे उभी पिके आडवी झाली. रस्त्यावर गारांचा खच पडल्याने बर्फवृष्टी झाल्यासारख वाटत होते. मराठवाड्यात, विदर्भात आणि खानदेशात अवकाळीने रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस राज्यात पाऊस आणि ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी तसेच मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. राज्यात येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसाने जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्याला झोडपले. पावसाचा फळबागांवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळाला आहे. मोसंबी, डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांना या वातावरणामुळे आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात तब्बल २ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. यात १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू आणि ७७७ हेक्टरवरील द्राक्षबागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १९१ गावांमधील २ हजार ७९८ शेतकरी या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय वीज अंगावर पडल्याने चार जनावरांचाही मृत्यू झाला.

पुण्यात होळीची धामधूम सरू असतांना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांचणी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पेटवलेल्या होळीला झाकण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच मंगळवारी पहाटे देखील वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

IPL_Entry_Point

विभाग