मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : पुण्यात होळी उत्सवावर पावसाने घातले विरजण, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा

Pune Rain : पुण्यात होळी उत्सवावर पावसाने घातले विरजण, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 06, 2023 08:36 PM IST

Pune Rain : पुण्यात होळीउत्सव सुरू असतांना अचानक पावसाने हजेरी लावण्याने पुणेकरांची त्रेधा उडाली. होळीचा पावसापासून बचाव करण्यासाठी लोखंडी पत्राने अनेक ठिकाणी झाकण्यात आल्या.

Pune Rain
Pune Rain

पुणे : पुण्यात होळीची धामधूम सरू असतांना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांचणी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पेटवलेल्या होळीला झाकण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.

नवी पेठ, गरवारे महाविद्यालय, कोथरूड, दांडेकर पूल, धानोरी, सदाशिव पेठ, टिळक रोड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर डेक्कन, घोले रोड परिसरात विजांच्या कडकडटासह पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने पुण्यात पावसाचा इशारा दिला होता. पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ हवामान असून आज संध्याकाळी अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

या पावसामुळे होळीच्या उत्सवावर विरजण घातले. काही नागरिक हे होलिका दहणाच्या तयारीत होते. तर काही नागरिकांनी होळीचे दहन केले होते. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तसेक पाण्यापासून होळीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी लोखंडी पत्राने होळीचे संरक्षण केले. पुण्यात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान राहणार असून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग