IPL 2024 चा ४४ वा सामना गुजरात आणि बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने २०० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने अवघ्या १६ षटकात लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून विल जॅकने ४१ चेंडूत शतक ठोकले आणि अनेक विक्रम तोडले.