मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambajogai News : आंबेजोगाई हादरले ! चॉकलेटच्या आमिषाने वृद्धाने केला ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Ambajogai News : आंबेजोगाई हादरले ! चॉकलेटच्या आमिषाने वृद्धाने केला ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 06, 2023 07:04 PM IST

Ambajogai News : बीड जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने तिच्यावर ६० वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 Crime
Crime

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बर्दापूर इथे एका ६० वर्षाच्या वृद्धाने चॉकलेट देण्याच्या आमिषाने एका ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या वृद्धाला अटक केली आहे. ती घरात गप्प गप्प राहत असल्याने ही घटना उघडकीस आली.

ट्रेंडिंग न्यूज

विष्णू बाबुराव सांदुळे (वय ६०) असे आरोपी वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही २ मार्च रोजी तिच्या शाळेतून घरी आली. ती खेळण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र, परत आल्यावर ती कुणाशीच काही बोलली नाही. ती गप्प असल्याने नेमके तिला काय झाले याची विचारणा घरच्यांनी केली. मात्र, पोट दुखत आहे एवढेच ती सांगत होती. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर देखील ती शांत होती. यामुळे घरच्यांना संशय आल्याने त्यांनी तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. मुलगी खेळायला गेल्यावर आरोपी वृद्ध तिच्याजवळ आला. 

त्याने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले. आणि तिला जुन्या पडक्या घरात घेऊन गेले. त्यांनी तिच्या सोबत अश्लील कृत्य केले. तसेच कुणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला घाबरून त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र, ग्रामस्थांनी घरच्यांना धीर दिल्याने त्यांनी पोलिसांत विष्णू सांदुळे याच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग