मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Cyber Crime : रेल्वे तिकीट कॅन्सल करणे पडले तब्बल साडेतीन लाखांना; वृद्धाची फसवणूक

Pune Cyber Crime : रेल्वे तिकीट कॅन्सल करणे पडले तब्बल साडेतीन लाखांना; वृद्धाची फसवणूक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 08:47 AM IST

Pune Cyber Crime : पुण्यात सायबचोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एका वृद्धाला रेल्वे तिकीट कॅन्सल करणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

Cyber crime (ht archives)
Cyber crime (ht archives) (HT_PRINT)

पुणे : पुण्यात एका वृद्धाला तिकीट कॅन्सल करणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी त्याला तब्बल साडेतीन लाख रुपयांनी गंडा घातला आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहार करतांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

औंधमधील एका ६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०२३ रोजी घडला. फिर्यादी यांनी रेल्वे तिकीट बूक केले होते. त्यांना काही कारणास्तव तिकीट रद्द करायचे होते. त्यांनी रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी मोबाइलवरून गुगलवर सर्च केले. यावेळी त्यांना रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या मोठ्या प्रमाणात वेबसाइट दिसल्या.

दरम्यान, त्यांनी त्यातील एक साईट उघडत रेल्वे कॅन्सल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, ही साईट सायबर चोरट्यांची होती. या साईटवर येताच त्यांना फोन आला. रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी त्यांचा पीएनआर नंबर सायबर चोरट्यांनी घेतला. या नंतर त्यांची माहिती घेतली.

थोड्या वेळाने त्यांना तिकीट रद्द करण्यासाठी लिंक पाठवली व ती भरून पाठविण्यास सांगितले. त्यांनी ती लिंक भरुन पाठवली. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले. त्यांनी खाते उघडून पाहिले असल्यास पैसे जमा नव्हते झाले.

मात्र, चोरट्यांनी थोड्या वेळात पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र, थोड्याच वेळात त्यांच्या बँकेतून त्यांना बँकेतून १ लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत का? असा विचारणारा फोन आला. दरम्यान त्यांनी नाही म्हणून सांगितले. दरम्यान, हा सायबर दरोडा असून तुमचे इंटरनेट बँकिंग बंद करत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, त्या काळात तब्बल साडे तीन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले होते.

IPL_Entry_Point

विभाग