मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मोठी बातमी! कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde : मोठी बातमी! कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mar 13, 2023, 12:38 PM IST

  • Eknath Shinde on Onion : कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Eknath Shinde on Onion

Eknath Shinde on Onion : कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

  • Eknath Shinde on Onion : कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई : कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला आले होते. कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. नाशिकमध्ये तर एका शेतकऱ्याने कांदा पिकाला आग लावली होती. शेकऱ्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला आज पासून सुरुवात झाली आहे. आज विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन देखील कांद्याला भाव मिळत नव्हता. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांभागृहात म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. आमचे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा