मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Car Accident : मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारला अपघात; एक ठार, तीन जखमी

Car Accident : मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारला अपघात; एक ठार, तीन जखमी

Dec 04, 2022, 09:45 AM IST

    • Car Accident Today : चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यात ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Car Accident On Mumbai-Pune Expressway (HT_PRINT)

Car Accident Today : चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यात ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    • Car Accident Today : चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यात ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Car Accident On Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघात होत आहे. तीन दिवसांपूर्वीच या महामार्गावर ट्रकचा अपघात झाल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा कार अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईलगत असलेल्या खोपोलीच्या हद्दीत हा अपघात झाला असून दुर्दैवानं एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या एका कारला खोपोलीनजीक अपघात झाला. यावेळी कारमध्ये एकाच कुटुंबातील तीन जण प्रवास करत होते. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या दोन मुलांसह पत्नीला गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावर सातत्यानं अपघातांची मालिका सुरुच आहे. शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे आणि टाटा समूहाचे माजी चेयरमन सायरस मिस्त्री यांचंही याच महामार्गावर कार अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.