मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sauji Manjiri : नवी मुंबईत थरार; बिल्डरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

Sauji Manjiri : नवी मुंबईत थरार; बिल्डरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

Mar 15, 2023, 07:38 PM IST

  • Navi Mumbai builder Sauji Manjiri Murder News : नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

Builder Savji Patel Murder In Navi Mumbai (HT)

Navi Mumbai builder Sauji Manjiri Murder News : नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Navi Mumbai builder Sauji Manjiri Murder News : नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

Builder Sauji Manjiri Murder In Navi Mumbai : पुण्यातील दुहेरी खुनाची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अज्ञात इसमांनी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक साऊजी मंजिरी यांचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केला आहे. त्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

साऊजी मंजिरी हे इम्पिरिया ग्रुपच्या पाच पार्टनरपैकी एक होते. ते ६५ वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काही कामासाठी ते कारनं निघाले होते. त्यावेळी सेक्टर सहा इथं दोन मोटारसायकलस्वार त्यांच्या कारला आडवे आले आणि काही कळायच्या आतच त्यांनी बेछूट गोळीबार केला. साऊजी यांना गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. 

गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अमित काळे, उपायुक्त पानसरे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि नेरुळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जमीन, मालमत्ता किंवा एखाद्या आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. साऊजी मंजिरी यांच्यावर कोणी व का गोळीबार केला याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

सावजी मंजिरी हे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायातील मोठं नाव आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची अशा तऱ्हेनं दिवसाढवळ्या हत्या झाल्यानं शहरातील उद्योजकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा