मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Surve : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले...

Prakash Surve : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 15, 2023 05:16 PM IST

sheetal mhatre viral video case : व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून या प्रकरणावर प्रकाश सुर्वेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. परंतु अखेर त्यांनी मौन सोडलं आहे.

prakash surve and sheetal mhatre viral video
prakash surve and sheetal mhatre viral video (HT)

prakash surve and sheetal mhatre viral video : शिंदे गटाचे आमदार शीतल म्हात्रे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या असतानाच शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळं ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता अखेरीस प्रकाश सुर्वे यांनी व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरील मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एक पत्रक जारी करत प्रकाश सुर्वे यांनी नेमका प्रकार काय आहे, याचा खुलासा केला आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक पत्र जारी करत म्हटलंय की, प्रकृतीच्या कारणास्तव मी वोकार्ड रुग्णालयात उपचार घेत होतो. सततच्या खोकल्यामुळं बोलण्यास त्रास होत होता. परंतु व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर मी बोलतच नाहीये, असा अपप्रचार करण्यात आला. माझ्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमामुळं मी दोनदा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. परिणामी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विरोधकांकडून माझं चरित्र्यहनन केलं जात आहे. राजकीय नैराश्यातून विरोधकांकडून विकृत गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.

एका प्रकल्पाचं उद्घाटन पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत प्रचंड गर्दी होती. कार्यकर्त्यांमधून प्रचंड आवाज येत असल्यामुळं बहिणी समान असलेल्या शीतल म्हात्रे मला कानात काही तरी सांगत होत्या. काही लोकांनी त्यावर चुकीचं गाणं लावून त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं. महिलांचा अपमान करण्याच्या उद्देश्यातून आणि घाणेरड्या मानसिकतेतूनच हा प्रकार घडल्याचा आरोपही प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.

IPL_Entry_Point