मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Supreme Court : बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टाची मस्करी चालवलीय; ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आक्रमक
eknath shinde vs uddhav thackeray
eknath shinde vs uddhav thackeray (HT)

Supreme Court : बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टाची मस्करी चालवलीय; ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आक्रमक

15 March 2023, 16:51 ISTAtik Sikandar Shaikh

Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला आहे.

Maharashtra Political Crisis Live Updates : राज्यातील सत्तासंघर्षावरील प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गट आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिंदे गट सुप्रीम कोर्टासह भारतीय राज्यघटनेची मस्करी करत असल्याचं म्हटलं आहे. त्याआधी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भगतसिंह कोश्यारी आणि शिंदे गटाला कडक शब्दांत सुनावल्यामुळं सुनावणीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, २१ जून २०२२ ते १९ जुलैपर्यंत शिंदे गटानं कोणत्याही कागदपत्रांमध्ये त्यांनी शिवसेनेवर दावा केलेला नव्हता. त्यामुळं बंडखोर आमदार हे शिवसेना नसून गट आहेत. त्यांना कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली?, असं करून आपण महाराष्ट्रासह संपू्र्ण देशात आयाराम-गयाराम संस्कृतीला आमंत्रण देतोय. शिंदे गटानं केवळ सुप्रीम कोर्टाचीच नाही तर देशाच्या संविधानाचीही मस्करी लावली आहे. सुप्रीम कोर्टानं हे महाराष्ट्राविषयी चालू दिलं तर हे पुढे संपूर्ण देशभरात घडेल, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आमदारांना अपात्रतेच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

आम्हीच शिवसेना आहोत, आमच्यात कोणतीही फूट नाही, असं एकीकडे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. परंतु निवडणूक आयोगासमोर शिंदे गटानं ते शिवसेनेतील फुटलेला गट असल्याचं सांगितलं आहे. जर ते शिवसेना असते तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरजच नव्हती. असंही ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. जुलै महिन्यापर्यंत त्यावर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता अथवा तो निर्णय बदलण्यात आलेलाही नव्हता. त्यामुळं शिंदे गट शिवसेना पक्षावर कसा काय दावा करू शकतो?, असाही सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.