मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Shocking: पुण्यातील घटनेने खळबळ; मुलगा, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Pune Shocking: पुण्यातील घटनेने खळबळ; मुलगा, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 15, 2023 06:26 PM IST

Pune Murder And Suicide: पुण्यातील औंध परिसरात मुलगा आणि पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Crime
Crime

Pune Horror: पु्ण्यातील औंध परिसरात आठ वर्षाचा मुलगा आणि पत्नीची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (बुधवारी, १५ मार्च २०२३) दुपारी उघडकीस आली. या घटनेमागील खरं कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सुदिप्तो गांगुली (वय, ४४), प्रियंका सुदिप्तो गांगुली (वय, ४०) आणि तनिष्क सुदिप्तो गांगुली (वय, ८), अशी मृतांची नावे आहेत. सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कार्यरत होता. तो आपल्या कुटुंबियांसोबत पुण्यातील औंध परिसरात राहत होता. दरम्यान, मंगळवारी सुदिप्तो फोन उचलत नसल्याने भावाने त्याच्या मित्राकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला, जो बंगळुरूला राहतो. तसेच सुदिप्तो हा बेपत्ता असल्याची चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बुधवारी दुपारी चतुःश्रृंगी पोलिसांनी सुदिप्तो यांचे औंध परिसरातील घर गाठले. दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी सुदिप्तोला बाहेरून आवाज दिला. परंतु, आतमधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सुदिप्तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, सुदिप्तोाचा मुलगा आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली. सुदिप्तोने मुलगा आणि पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज चतुःश्रृंगी पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सुदिप्तोने कोणत्या कारणामुळे असे पाऊल उचचले? यामागे नेमके काय कारण आहे? याचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

IPL_Entry_Point

विभाग