मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime News : क्षुल्लक वादातून महिलेनं बस चालकाचं डोकं फोडलं, पुण्यातील धक्कदायक प्रकार

Pune Crime News : क्षुल्लक वादातून महिलेनं बस चालकाचं डोकं फोडलं, पुण्यातील धक्कदायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 15, 2023 05:39 PM IST

Pune Crime News Marathi : किरकोळ कारणावरून पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Abhinav College Chowk Pune Crime News Marathi
Abhinav College Chowk Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Abhinav College Chowk Pune Crime News Marathi : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक भागांमध्ये कोयता गँगनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता एका महिलेनं किरकोळ वादातून बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील अभिनव कॉलेज चौकात ही घटना घडली असून त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. आरोपी महिला ही भाजपची माजी नगरसेविका असल्याचा दावा पीडित बस चालकानं केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून निघालेल्या पीएमपी बसचा अभिनव कॉलेज चौकात किरकोळ अपघात झाला. त्यावेळी आरोपी महिलेनं बस चालक शशांक देशमाने यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेनं तीन साथीदारांच्या मदतीनं बस चालक शशांक देशमाने यांना बेदम मारहाण करत त्यांचं डोकं फोडलं. त्यानंतर बस चालकानं थेट पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय आरोपी महिला ही भाजपची माजी नगरसेविका असल्याचाही दावा जखमी बसचालकानं केला आहे.

आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत बसचालक देशमाने यांना गंभीर मार लागला आहे. त्यानंतर आता त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती घेतल्यानंतर पीएमपीएल सीएमजी ओमप्रकाश बकोरिया यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी या प्रकरणावर चर्चा केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक भागांमध्ये कोयता गँगकडून नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पीएमपी बसचालकाला मारहाण करण्याची घटना समोर आल्यानंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग