मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Crime : नांदेड हादरले ! बेपत्ता प्रेमीयुगलाचे मृतदेह नदीकिनारी सापडले, कुटुंबीयांचा होता प्रेमाला विरोध

Nanded Crime : नांदेड हादरले ! बेपत्ता प्रेमीयुगलाचे मृतदेह नदीकिनारी सापडले, कुटुंबीयांचा होता प्रेमाला विरोध

May 25, 2023, 09:05 AM IST

    • Nanded Mudkhed Crime news: नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बेपत्ता प्रेमी युगलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्याचा विरोध होता.
Nanded Mudkhed Crime news

Nanded Mudkhed Crime news: नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बेपत्ता प्रेमी युगलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्याचा विरोध होता.

    • Nanded Mudkhed Crime news: नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बेपत्ता प्रेमी युगलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्याचा विरोध होता.

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : पत्नी नांदायला येत नसल्याने तरुणाचा भर पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

HSC Result Today : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट ! बारावीचा आज निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

विकास धोंडिबा तुपेकर (वय २२) आणि ऋतुजा बालाजी गजले ( वय १८) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मृत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोघे मुगट गावात शेजारी राहतात. दरम्यान, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, याची माहिती घरच्यांना मिळाली. दोघांच्याही घरच्यांचा त्याच्या प्रेमाला विरोध होता. यावरून दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांनी मारहाण केली होती. असे असले तरी दोघांनी त्यांच्या नात्यात दुरावा येऊ दिला नाही. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी हे दोघे बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घरचे घेत होते. हे दोघेही गावात दिसत नसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या.

Narayngaon Tomato market : नारायणगाव बाजार समितीत लाल चिखल; एक किलो रुपये भाव मिळाल्याने टोमॅटो फेकून शेतकऱ्यांचा निषेध

दरम्यान, २३ मे रोजी सायंकाळी या दोघांचाही मृतदेह गावातील गोदावरी नदीच्या काठावर आढळला. दोघांचेही मृतदेह हे कुजले होते. त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ही घटना गावात समजताच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केलाया प्रकरणी पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली त्यांची हत्या करण्यात आली आहे या बाबत गावात उलट सुटल चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा