मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CSMT Himalaya bridge : मुंबईकरांची पायपीट थांबणार! सीएसएमटी रेल्वे स्थानकास जोडणारा पूल अखेर खुला

CSMT Himalaya bridge : मुंबईकरांची पायपीट थांबणार! सीएसएमटी रेल्वे स्थानकास जोडणारा पूल अखेर खुला

Mar 30, 2023, 05:07 PM IST

  • CSMT Bridge open to public : मुंबई महापालिका मुख्यालय, किला कोर्ट व कामा हॉस्पिटलसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना सीएसएमटी रेल्वे स्थानकाशी जोडणारा हिमालय पूल अखेर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.

CSMT Bridge

CSMT Bridge open to public : मुंबई महापालिका मुख्यालय, किला कोर्ट व कामा हॉस्पिटलसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना सीएसएमटी रेल्वे स्थानकाशी जोडणारा हिमालय पूल अखेर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.

  • CSMT Bridge open to public : मुंबई महापालिका मुख्यालय, किला कोर्ट व कामा हॉस्पिटलसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना सीएसएमटी रेल्वे स्थानकाशी जोडणारा हिमालय पूल अखेर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.

CSMT Bridge open to public : नोकरीसाठी रोजच्या रोज फोर्ट परिसरात ये-जा करणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असा हिमालय पूल आजपासून अखेर खुला झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांची रोजची पायपीट थांबणार आहे व त्यांचा बराच वेळ वाचणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

मुंबईतील अत्यंत वर्दळीचा आणि सर्वाधिक वापर केला जाणारा हा पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळला होता. या अपघातात सात पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनातील चर्चेअंती महापालिकेनं पुलाचं काम सुरू केलं होतं. मात्र, करोना लॉकडाउनमुळं हे काम रखडलं होतं. लॉकडाउन उठल्यानंतर पुलाचं काम वेगानं सुरू होतं. पुलासाठी स्टेनलेस स्टीलचे पाच गर्डर ओडिशातून आणले गेले होते. हे काम फेब्रुवारी महिन्याअखेर पूर्ण होईल, असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, तांत्रिक कारणामुळं ते लांबलं होते ते अखेर आता पूर्ण झालं असून हा पूल नागरिकांसाठी खुला झाला आहे.

सीएसएमटी स्थानकातून उजव्या बाजूला बाहेर पडण्यासाठी दोन प्रमुख गेट आहेत. त्यातील ठाण्याच्या बाजूकडील गेटमधून बाहेर पडण्यासाठी या पुलाचा वापर व्हायचा. किल्ला कोर्ट, मुंबई महापालिका मुख्यालय, कामा रुग्णालय, पासपोर्ट कार्यालय, झेव्हियर्स कॉलेजसह अनेक कार्यालयांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता. तो बंद असल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर लोकांना बराच वळसा घालून यावं लागत होतं. त्यामुळं रस्ता ओलांडण्याचे प्रकार व अपघाताचा धोकाही वाढला होता. ही सगळी अडचण आता दूर झाली आहे.

सीएसएमटी स्थानकाला जोडणारा हा पूल ३३ मीटर लांब व ४.४ मीटर रुंद आहे. हा पूल पोलादापासून तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांहून अधिक खर्च आल्याचं सांगण्यात येतं. लवकरच या पुलाला सरकता जिनाही बसवण्यात येणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा