Live News Updates 30 March 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले मुंबादेवीचे दर्शन
CM Visits Mumbadevi Temple: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
Thu, 30 Mar 202316:17 IST
कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा, योजना केवळ उद्यासाठी
महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत व्याज, विलंब आकारात माफी यासह सुधारीत थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला आहे. उद्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे.
Thu, 30 Mar 202311:16 IST
संभाजी नगरमधील राड्यानंतर इम्तियाज जलील पोहोचले थेट मंदिरात
Imtiyaz Jaleel on Chhatrapati Sambhaji Nagar Row : छत्रपती संभाजीनगर इथं राम मंदिराबाहेर झालेला राडा व जाळपोळीनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असून खासदार इम्तियाज जलील थेट राममंदिरात पोहोचले आहेत.
Thu, 30 Mar 20238:21 IST
नागपुरात रामनवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन
नागपूर शहरात भाजपतर्फे आज रामनवमीनिमित्त बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गस्थ केले.
Thu, 30 Mar 20235:42 IST
Imtiyaz Jaleel : संभाजी नगरमधील राड्यानंतर इम्तियाज जलील पोहोचले थेट मंदिरात
Imtiyaz Jaleel on Chhatrapati Sambhaji Nagar Row : छत्रपती संभाजीनगर इथं राम मंदिराबाहेर झालेला राडा व जाळपोळीनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असून खासदार इम्तियाज जलील थेट राममंदिरात पोहोचले आहेत. मंदिराचं कुठलंही नुकसान झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं असून शांततेचं आवाहन केलं आहे.
Thu, 30 Mar 20235:39 IST
छ.संभाजीनगरमध्ये तब्बल ८१ लाखांचा गुटखा पकडला
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरात येणाऱ्या अवैध गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल ८१ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाळूज परिसरातील साजापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Thu, 30 Mar 20234:30 IST
Mumbai Himalaya Bridge : सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून प्रवाशांसाठी सुरु होणार
२०१९ मधील दुर्घटनेनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल चार वर्षांनंतर आजपासून सुरु होणार आहे.
Thu, 30 Mar 20230:52 IST
Pune : रस्त्यावरील बालकांसाठी पथदर्शी फिरते पथक स्थापन होणार
रस्त्यावरील बालकांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ‘पथदर्शी फिरते पथक’ या प्रकल्पास केंद्र शासनाने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत मान्यता दिलेली आहे. पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
Thu, 30 Mar 20230:50 IST
Pune : शिधापत्रिकांधारकांना ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देवून अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. भ्रमणध्वनी क्रमांक अद्यावत केल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळाले याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Thu, 30 Mar 20230:50 IST
Pune : वाहन नोंदणी व आकर्षक क्रमांकाचे शुल्क ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत भरण्याचे आवाहन
आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे नागरिकांनी वाहन नोंदणी व आकर्षक क्रमांकाबाबतचे शुल्क ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत धनाकर्षाद्वारे भरणा करावे. दुपारी २ वा.नंतर धनाकर्ष स्वीकारणे शक्य होणार नसल्याने नागरीकांनी या बाबीची नोंद घेवून गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
Thu, 30 Mar 20230:49 IST
Pune : रोटरी युथ एक्स्चेंज” डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने तरुणांना महितीसाठी मोफत सेमिनार
रोटरी युथ एक्स्चेंज डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने रविवार दिनांक २ एप्रिल रोजी पिपरी कम्युनिटी सेंटर येथे संध्याकाळी ४ ते ७ वाजता युवकांना रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.
Thu, 30 Mar 20230:48 IST
Pune : क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यांत राजमाता जिजाऊ संघ विजयी.
क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज - आंतर जिल्हा युवा लीग २०२३" यास्पर्धाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रो कबड्डी व आंतरराष्ट्रीय खेळाडू रिशांक देवाडिगा व विशाल माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यांच्यावेळी विधानसभा आमदार जयंतराव पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजमाता जिजाऊ संघ विरुद्ध महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या झालेल्या प्रेक्षणीय सामन्यांत राजमाता जिजाऊ संघाने एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतरापर्यत २२-०६ अशी आघाडी राजमाता जिजाऊ संघाकडे भक्कम आघाडी होती. मंदिरा कोमकर व सलोनी गजमल यांच्या चतुरस्त्र चढायांच्या समोर महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ मध्यंतराला पर्यत २ वेळा ऑल आऊट झाला. राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकरने सुपर टेन पूर्ण करत सामना एकतर्फी केला.
Thu, 30 Mar 20230:46 IST
Mumbai : किशोरी पेडणेकर यांच्या याचिकेवर सुनावणी
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा आज संपणार. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना दिले होते निर्देश. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकरांवी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होईल.
Thu, 30 Mar 20230:45 IST
Mumbai : नवाझुद्दीन सिद्दिकीच्या याचिकेवर सुनावणी
बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची आपला भाऊ आणि पत्नी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव. या दोघांवर दाखल केला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा. भाऊ शमशुद्दिन सिद्दीकी आणि पत्नी झैनब सिद्दीकी यांनी नवाझबाबत दिशाभूल करणारी वक्तव्यं केल्याचा याचिकेतून आरोप. त्याच्या विरोधातील पोस्ट आणि आर्टिकल बदनामीकारक असून नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा मलिन केल्याचा याचिकेतूना दावा.
Thu, 30 Mar 20230:45 IST
Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी
अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साल २०१२ -१३ आणि २०१३-१४ ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर उत्तर देत प्राप्तीकर विभगानं आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे, त्यावर आज सुनावणी होईल.
Thu, 30 Mar 20230:44 IST
Salman Khan : सलमान खानच्या याचिकेवर आज सुनावणी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाचा आज निर्णय. त्याने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. एका पादचाऱ्यावर हल्ला करून त्याला धमकावल्या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
Thu, 30 Mar 20230:38 IST
Ram Navmi : देशभरात आज रामनवमीच्या उत्साह; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Ram Navmi : आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून ही नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे.