मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Murder : बीड हादरले ! शेतातून गेला म्हणून शाळकरी मुलाची हत्या करून मृतदेह झाडाला टांगला

Beed Murder : बीड हादरले ! शेतातून गेला म्हणून शाळकरी मुलाची हत्या करून मृतदेह झाडाला टांगला

Apr 19, 2023, 10:07 AM IST

    • Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात नित्रुड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातून गेल्याने एका शाळेकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.
Gondia crime news

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात नित्रुड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातून गेल्याने एका शाळेकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.

    • Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात नित्रुड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातून गेल्याने एका शाळेकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.

बीड : बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात नित्रुड परिसरात घडली आहे. काही नराधमांनी एक मुलगा शेतातून गेल्याने त्याचा राग आल्याने त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर क्रूरतेचा कळस गाठत या मुलाचा मृतदेह शेतातील एका झाडाला टांगण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Maharashtra Weather : राज्य तापले ! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार; मुंबई, पुणे, विदर्भात उष्णतेची लाट

गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय १५, रा.नित्रुड, ता. माजलगाव बीड) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

karagruh police bharti 2023 : राज्य कारागृहात विभागात होणार मेगा भरती; तब्बल २ हजार पदे भरणार

या घटनेची हकिगत अशी की, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे राहणार गुलाम मोहम्मद हा इयत्ता नववी शिकत होता. मंगळवारी (दि १८) तो ७ च्या सुमारास त्यांची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी जात होता. यावेळी आरोपी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात गाठत तू आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलामला मारहाण करण्यास सुरूवाट केली.

Maharashtra Weather : राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट; अनेक भागात वादळी वाऱ्यासाह गारपीटीची शक्यता

त्याला जमिनीवर पाडून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. यानंतर त्यांनी गुलामने सरपणासाठी नेलेल्या ओढणीने त्याचा गळा आवळून तिघांनी त्याचा खून केला. या वेळी घाबरलेल्या गुलामच्या भाऊ आणि बहिणीने पळ काढत घर गाठले. त्यांनी याची माहिती घरच्यांना दिली. घरच्यांनी तातडीने घटनास्थळी गेले. यावेळी सर्व जण तेथील दृश्य पाहून हादरले. पालखी महामार्गावरील नित्रुडपासून जवळच असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह आरोपींनी लटकावला होता. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगावला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान, गुमालच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी देखील गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा