मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : राज्य तापले ! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार; मुंबई, पुणे, विदर्भात उष्णतेची लाट

Maharashtra Weather : राज्य तापले ! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार; मुंबई, पुणे, विदर्भात उष्णतेची लाट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2023 09:54 AM IST

Maharashtra Weather : राज्यात सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक जिल्ह्यात तापमान हे ४० शीच्या पुढे पोहचले आहे.

Maharashtra Weather
Maharashtra Weather (PTI)

मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला असला तरी त्यासोबत तापमान देखील वाढले आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भात पारा ४० च्या पुढे गेले आहे. मंगळवारी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ४५ अंश सेल्सिअस तापमान, मुरबाडमध्ये ४४ तर पुण्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

maratha reservation : मराठा आरक्षण बैठकीत गदारोळ, चंद्रकांत पाटलांनी १५ मिनिटांत बैठक उरकत काढला पाय

राज्यात मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. या भागात अवकाळी पावसामुळे ढगाळ हवामान असले तरी दिवसा तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाले. अनेक जिल्ह्यात पारा हा चाळीशी पार पोहचला आहे. उष्णतेच्या लाटेची झळ ही मुंबई, पुणे, कोकण परिसरातही जाणवत आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही मंगळवारी तापमान चाळीश अंशा पेक्षा जास्त होते.

Maharashtra Weather : राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट; अनेक भागात वादळी वाऱ्यासाह गारपीटीची शक्यता

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पारा हा ४० अंशांच्या वर नोंदला गेला. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीहून २.३ अंशांनी अधिक होते. छत्रपती संभाजीनगर येथे ३९.८, बीड येथे ४१.६, कोल्हापूर येथे ३९.१, नांदेड येथे ३९.८, परभणी ४१.७, सांगली ३९.६, सातारा ३८.८, सोलापूर येथे ४१.८, उदगीर येथे ३९.५, नाशिक य़ेथे ३९.१, जळगाव येथे ४१.६ असे तापमान राज्यात मंगळवारी नोंदवले गेले.

देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने घेलती आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी. दुपारच्या वेळेला घरा बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग