मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट; अनेक भागात वादळी वाऱ्यासाह गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट; अनेक भागात वादळी वाऱ्यासाह गारपीटीची शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2023 09:57 AM IST

Maharashtra Weather Update : वाऱ्याची खंडिता किंवा कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत जात आहे तसेच अरबी समुद्रात व बंगालच्या समुद्रातून मॉईश्चर वाढल्याने राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (HT_PRINT)

पुणे : काल असलेली वाऱ्याची खंडिता किंवा कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत जात आहे, तसेच अरबी समुद्रात व बंगालच्या समुद्रातून मॉईश्चर वाढले असल्याने हवामान दमट झाले आहे. यामुळे तापमानात फारसा बदल होणार नसला तरी मेघ गर्जना व वीजांचा कडाडण्याचे प्रमाण कमी राहणार आहे. राज्यात पुढील चार दिवसासाठी बऱ्याच ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

Thane Fire : ठाण्यात अग्नीतांडव ! ओरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग, लाखोंचे नुकसान

देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. मात्र विदर्भात अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार पोहोचलंय. अशात काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

Car Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे आणि आसपासच्या परिसरात १८ आणि १९ एप्रिलला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या सोबतच मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २० ते २४ एप्रिलला आकाश निरभ्र राहुल दुपारी किंवा संध्याकाळी अंशत: ढगाळ राहणार आहे.

 

पुढील दोन दिवसांत विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. नागपूर शहराच्या तापमान तब्बल ४१ अंशावर पोहचले आहेत. आज देखील तापमान वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग