मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेब ठाकरेंमध्ये जो मनाचा मोठेपणा होता, तो मोदींमध्ये नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

बाळासाहेब ठाकरेंमध्ये जो मनाचा मोठेपणा होता, तो मोदींमध्ये नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

Oct 06, 2022, 10:55 PM IST

    • कोणतेही राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे विशाल मन शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावला. 
प्रकाश आंबेडकर

कोणतेहीराजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जेविशाल मन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही,असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावला.

    • कोणतेही राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे विशाल मन शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावला. 

अकोला -आज अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा (dhamma chakra pravartan rally) पार पडला.भारतीय बौद्ध महासभेकडून आयोजित केल्या जात असलेल्या या सभेला गेल्या ३८ वर्षांपासून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) प्रमुख वक्तेम्हणून मार्गदर्शन करतात.यंदाभरपावसात ही सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत वंचित महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

कोणतेहीराजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जेविशाल मन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. अकोल्यात आज प्रकाश आंबेडकरांनी भर पावसात सभाघेऊन विविध विषयांवर आपली मते मांडली.अकोला क्रिकेट क्लबवर झालेल्या मैदानावरच्या या सभेला भरपावसातही लोकांनी गर्दी केली होती.

यावेळीप्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरपंचाची निवड सरकारने थेटजनतेतूनकेली आहे. यापुढे सर्वच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा,असं आवाहनही त्यांनी केलं.ज्यांनी आमच्यावर'बी टीम'चा आरोप केलाय. तेच आमच्यासोबत आज बसायच्या गोष्टी करतायेत,असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला.

देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,भारताची अर्थव्यवस्था दारूड्यासारखी आहे. दारूड्या जसं एक-एक सामान विकतो, तसा देशाचा कारभार आहे. पंतप्रधान मोदींना दारूड्या म्हणणार नाही. मात्र, वागणूक तशीच आहे, असा टोला आंबेडकरांनी लगावला.