मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena : ठाकरे-शिंदे यांच्यात दिलजमाई..! दोन्ही कुटुंबात रंगणार लग्नसोहळा, पत्रिका व्हायरल

Shivsena : ठाकरे-शिंदे यांच्यात दिलजमाई..! दोन्ही कुटुंबात रंगणार लग्नसोहळा, पत्रिका व्हायरल

Oct 06, 2022, 09:14 PM IST

    • ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा (Thackeray and shinde family marriage) होणार आहे. येत्या ८ऑक्टोबरचा मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला आहे. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.
ठाकरे-शिंदे यांच्यात दिलजमाई..

ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा (Thackeray and shinde family marriage) होणार आहे. येत्या ८ऑक्टोबरचा मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला आहे. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.

    • ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा (Thackeray and shinde family marriage) होणार आहे. येत्या ८ऑक्टोबरचा मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला आहे. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.

मुंबई – शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटातील संघर्षाने राज्यातील राजकारणाचा अवकाश व्यापून टाकला आहे. सर्वत्र या दोन गटातील संघर्षाची चर्चा केली जाते. दसरा मेळाव्यातही शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आलेहोते. दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत एकमेकांवर टीकेची झोड उठवली. या राजकीय गदारोळात व आरोप-प्रत्यारोपात सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिंदे आणि ठाकरे कुटूंबाच्या दिलजमाईची ही पत्रिका आहे. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं असताना शिंदे-ठाकरे कुटुंबियांच्या दिलजमाईच्या पत्रिकेमुळे (Thackeray and shinde family marriage) नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा होणार आहे. येत्या ८ऑक्टोबरचा मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला आहे. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हे लग्न आहे. या पत्रिकेने पुण्याचेच नाही तर राज्याचे लक्ष वेधले आहे. एकीकडे राजकारणात शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असताना या शिंदे आणि ठाकरे कुटुंबात दिलजमाईचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. ही पत्रिका पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत.

<p>व्हायरल लग्नपत्रिका</p>

जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे कुटूंबातील कन्या अनुराधा यांचा शुभविवाह ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.