मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: राग शांत करण्यासाठी रोज करा ही ३ योगासने, आरोग्याला होतील मोठे फायदे

Yoga Mantra: राग शांत करण्यासाठी रोज करा ही ३ योगासने, आरोग्याला होतील मोठे फायदे

May 25, 2023, 08:17 AM IST

    • Yoga for Anger Control: ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांना डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. तुम्हालाही जास्त राग येत असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी ही योगासने करा.
सर्वांगासन

Yoga for Anger Control: ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांना डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. तुम्हालाही जास्त राग येत असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी ही योगासने करा.

    • Yoga for Anger Control: ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांना डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. तुम्हालाही जास्त राग येत असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी ही योगासने करा.

Yoga Asanas to Control Anger: राग ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. जो तुम्हीही तुमच्या आयुष्यात कधीतरी अनुभवला असेलच. पण जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर ते तुमच्या मानसिकच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांना डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. चला जाणून घेऊया रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती ३ योगासने सर्वोत्तम आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम

Onion Paratha Recipe: रेगुलर बटाट्याऐवजी आज नाश्त्यात बनवा कांद्याचा पराठा, जाणून घ्या रेसिपी!

World Tuna Day 2024: जागतिक टूना दिवस का साजरा करतात? जाणून घ्या टूना माशांबद्दल मनोरंजक माहिती!

Kurti Style Mistakes: कुर्ती घालताना चुकूनही करू नका या चुका, खराब होईल तुमची स्टाईल

सर्वांगासन

सर्वांगासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. आता दीर्घ श्वास घेत आकाशाकडे पाय उचलून, कंबरेवर हात ठेवा आणि श्वास घेताना पाय डोक्याजवळ आणा. हे करत असताना तुमचे खांदे, पाठीचा कणा आणि नितंब एका सरळ रेषेत आणा आणि काही वेळ या स्थितीत रहा. हे आसन करताना मन शांत ठेवा.

भ्रामरी

भ्रामरी आसन करण्यासाठी सुखासन किंवा पद्मासनात बसून दीर्घश्वास घ्या आणि तीन बोटांनी डोळे बंद करा आणि कानावर अंगठा ठेवा. आता तोंड बंद ठेवा आणि मनात ‘ओम’ चा जप करा. हे ३ ते २१ वेळा करा.

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम करण्यासाठी सर्वप्रथम पद्मासनात बसा. आता एक हात गुडघ्यावर ठेवून दुसऱ्या हाताने डाव्या नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. यानंतर आपल्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. असेच विरुद्ध बाजूने करून आवर्तन पूर्ण करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग