मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Care Tips: बाळाला डायपर घालताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, येणार नाही कोणतीही अडचण

Baby Care Tips: बाळाला डायपर घालताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, येणार नाही कोणतीही अडचण

Sep 30, 2023, 09:48 PM IST

    • Parenting Tips: अनेक वेळा डायपर चांगले नसल्यामुळे ते लीक होऊ लागते आणि बाळाला पुरळ उठणे किंवा कोरडेपणाचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत बाळाला डायपर वापरताना काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
बाळाला डायपर वापरताना घ्यावयाची काळजी (unsplash)

Parenting Tips: अनेक वेळा डायपर चांगले नसल्यामुळे ते लीक होऊ लागते आणि बाळाला पुरळ उठणे किंवा कोरडेपणाचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत बाळाला डायपर वापरताना काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

    • Parenting Tips: अनेक वेळा डायपर चांगले नसल्यामुळे ते लीक होऊ लागते आणि बाळाला पुरळ उठणे किंवा कोरडेपणाचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत बाळाला डायपर वापरताना काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

Mistakes While Using Diapers For Newborn Baby: नवजात बाळाचे संगोपन करताना नवीन पालक अनेकदा अनेक गोष्टींबद्दल गोंधळलेले असतात. ज्यामध्ये त्यांचे पहिले टेन्शन हे बाळाला घातलेल्या डायपरचे असते. ही एक छोटीशी समस्या वाटू शकते. पण नवीन पालकांसाठी ही समस्या त्यांना स्वस्थ झोपू देत नाही. वास्तविक लहान मुले अनेकदा बेड ओले करतात. त्यामुळे बहुतेक पालक आपल्या मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना कोरडे ठेवण्यासाठी नेहमी डायपर घालतात. परंतु काही वेळा डायपरची क्वालिटी चांगली नसल्यामुळे ते लीक होऊ लागते आणि बाळाला पुरळ किंवा ड्रायनेसचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत आपल्या बाळाला डायपर वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

डायपर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

- अशा डायपरची निवड करा ज्याचे फॅब्रिक मऊ असेल. जेणेकरून मुलांच्या त्वचेला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही. यासाठी तुम्ही लिनेन किंवा कॉटन क्लॉथ डायपर घेऊ शकता.

- खूप कमी लोकांना माहित आहे की नॅपी वर एक रंगीत रेषा आहे, जी जेव्हा पिवळ्या ते निळ्या रंगात बदलते तेव्हा सूचित करते की नॅपी ओली झाली आहे आणि ती बदलणे आवश्यक आहे.

- जर तुमच्या मुलाला जास्त डायपर घातल्यामुळे त्वचेवर पुरळ उठत असेल आणि पाय आणि मांड्यांची त्वचा लाल झाली असेल तर लगेच त्या भागावर एलोवेरा जेल लावा. याशिवाय काही काळ बाळाला डायपरशिवाय तसेच राहू द्या आणि पुरळ असलेल्या भागांवर बेबी क्रीम लावा.

 

- लहान मुलांसाठी नेहमी एयरटाइट प्लास्टिक कव्हर असलेले डायपर वापरा. दर तीन ते चार किंवा जास्तीत जास्त ६ तासांनी डायपर बदला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)