Precautions While Feeding Banana To Kids: मूल ६ महिन्यांचे झाल्यावर,त्याला कमी प्रमाणात सॉलिड पदार्थ खायला सुरुवात केली जाते. अशा स्थितीत मुलासाठी पहिला आहार पौष्टिक, मऊ, गोड आणि खायला व बनवायला सोपा असावा, याची विशेष काळजी घेतली जाते. फळांमध्ये केळी ही पहिले मुलांना दिली जाते. पोषक तत्त्वाची समृद्ध असल्याने केळी हे मुलांच्या सर्वांगीण विकासास मदत करते. बाळासाठी याचे अनेक फायदे असले तरी त्याला केळी खाऊ घालताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
- पूर्ण पिकलेली केळी मुलांना खायला द्या. कारण ती पचायला सोपी, गोड, मऊ आणि चवदार असतात.
- खोकला किंवा श्वसनाचा त्रास असलेल्या बाळांना केळी देणे टाळणे चांगले आहे. रिपोर्ट्सनुसार केळी जास्त श्लेष्मा तयार करून सर्दी किंवा खोकला वाढवू शकतात.
- रात्री उशिरा केळी खाल्ल्याने मुलांना ब्लोटिंग किंवा गॅसची समस्या वाढू शकते.
- पहिल्यांदा केळीची प्युरी किंवा मॅश केलेली केळी मुलाला खायला द्या.
- तुमच्या मुलाला जास्त केळी देऊ नका. कारण त्यामुळे त्यांचे पोट भरू शकते आणि त्यांची दूध आणि इतर अन्नाची भूक कमी होऊ शकते.
तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर किंवा त्याने घन पदार्थ किंवा सॉलिड फूड खाण्यास सुरुवात केल्यावर तुम्ही त्याच्या आहारात केळीचा समावेश करू शकता. चमच्याने दूध पिणारे आणि ज्या बाळांचे स्तनपान सोडवायचे आहे अशा दोन्ही बाळांना केळी खायला दिले जाऊ शकते. ६ महिन्यांच्या बाळासाठी दररोज एक लहान केळी चांगली असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या