मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Travel Tips: डिसेंबरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर ‘या’ हिल स्टेशनला भेट द्या!

Winter Travel Tips: डिसेंबरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर ‘या’ हिल स्टेशनला भेट द्या!

Nov 22, 2022, 10:23 AM IST

    • Snowfall Hill Station: डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हिल स्टेशन्सबद्दल माहिती देत आहोत.
विंटर ट्रॅव्हल टिप्स (Freepik)

Snowfall Hill Station: डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हिल स्टेशन्सबद्दल माहिती देत आहोत.

    • Snowfall Hill Station: डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हिल स्टेशन्सबद्दल माहिती देत आहोत.

December Traveling: डिसेंबर महिना काही दिवसात सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेकांना नाताळाच्या सुट्ट्या असतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि नाताळीची सुट्टी घालवण्यासाठी अनेकजण ट्रॅव्हलिंगचा प्लॅन आखतात. या थंडीच्या हंगामात अनेक ठिकाणी बर्फ पडतो. तुम्हीही हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी काही हिल स्टेशनवरही जाऊ शकता. डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हिल स्टेशन्सबद्दल माहिती देत आहोत. तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याची योजना देखील करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

कुल्लू आणि मनाली

हिमाचल प्रदेशातील ही अतिशय सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही येथे हिरवीगार जंगले, बर्फाच्छादित पर्वत आणि विविध साहसी उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. सोलांग व्हॅली, रोहतांग पास आणि पार्वती व्हॅली यांसारख्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी देखील जाऊ शकता.

चोपटा

हे हिल स्टेशन उत्तराखंडमध्ये आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच येथे बर्फवृष्टी सुरू होते. तुम्ही येथे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसारख्या अ‍ॅक्टिविटीज आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही येथे तुंगनाथ मंदिर, देवरिया ताल आणि उखीमठ सारख्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

बिनसार

हे उत्तराखंडचे एक छोटेसे आणि अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथील हिरव्यागार जंगलांचे सुंदर नजारे तुम्हाला भुरळ घालतील. तुम्ही येथे झिरो पॉइंट, गोलू देवता मंदिर आणि बिनसार वन्यजीव अभयारण्य यांसारख्या ठिकाणी भेट देऊ शकता.

खज्जियार

हे हिल स्टेशन हिमाचलमध्ये आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. आपण येथे भेट देण्याची योजना देखील करू शकता.

 

विभाग