मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Pickle: कैरीचे आंबट-गोड लोणचे टिकेल जास्त दिवस, ट्राय करा ही सिक्रेट रेसिपी

Mango Pickle: कैरीचे आंबट-गोड लोणचे टिकेल जास्त दिवस, ट्राय करा ही सिक्रेट रेसिपी

Jun 06, 2023, 11:39 AM IST

    • Sweet Mango Pickle Recipe: जर तुम्हाला कैरीचे आंबट-गोड लोणचे आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे लोणचे जास्त दिवस खराब होणार नाही आणि चवीला स्वादिष्ट लागेल. बनवण्याची ही सिक्रेट पद्धत काय आहे ते जाणून घ्या.
कैरीचे आंबट-गोड लोणचे (freepik)

Sweet Mango Pickle Recipe: जर तुम्हाला कैरीचे आंबट-गोड लोणचे आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे लोणचे जास्त दिवस खराब होणार नाही आणि चवीला स्वादिष्ट लागेल. बनवण्याची ही सिक्रेट पद्धत काय आहे ते जाणून घ्या.

    • Sweet Mango Pickle Recipe: जर तुम्हाला कैरीचे आंबट-गोड लोणचे आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे लोणचे जास्त दिवस खराब होणार नाही आणि चवीला स्वादिष्ट लागेल. बनवण्याची ही सिक्रेट पद्धत काय आहे ते जाणून घ्या.

Sweet Mango Pickle Recipe: उन्हाळ्यात मिळणाऱ्या कैरी लोक वर्षभर साठवून ठेवतात. कच्च्या कैरीपासून लोणचे, चटणी, मुरंबा अशा अनेक गोष्टी बनवता येतात. कैरीचे गोड लोणचे अनेकांना आवडते. पण वर्षभर टिकेल हे अवघड असते. अनेकदा ते काही महिन्यातच खराब होते. जर तुम्हाला कच्च्या कैरीचे गोड लोणचे बनवायचे असेल आणि ते जास्त काळ साठवायचे असेल तर ही सिक्रेट रेसिपी अवश्य फॉलो करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल.

ट्रेंडिंग न्यूज

Travel Tips: कुटूंबासोबत चित्रकूट फिरण्याचे करू शकता प्लॅनिंग, भेट देण्यासाठी हे आहेत बेस्ट ठिकाणं

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

कैरीचे आंबट गोड लोणचे बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्रॅम कैरी

- ८० ग्रॅम खडी साखर

- २ चमचे बडीशेप पावडर

- २ चमचे सुंठ पावडर

- १ चमचा गरम मसाला

- १ चमचा काळे मीठ

- १ चमचा काश्मिरी लाल तिखट

कैरीचे आंबट गोड लोणचे बनवण्याची कृती

सर्वप्रथम कैरीचे उभे लांबट तुकडे करून घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात हे कैरीचे तुकडे घालून अर्धे शिजू द्यावे. त्यांना पूर्णपणे शिजू देऊ नका आणि वितळू नका. आता हे अर्धे शिजलेले कैरीचे तुकडे एका स्वच्छ कोरड्या कपड्यावर काढा. त्यातील पाणी गाळून कोरडे करा. आता एका भांड्यात खडी साखर घ्या आणि त्यात पाणी घाला आणि विरघळू द्या. नंतर त्यात अर्धे शिजवलेल्या कैरीचे तुकडे टाकून शिजवून घ्या. आता त्यात काळे मीठ, काश्मिरी लाल मिरची घालून मिक्स करून मंद आचेवर शिजवा. तसेच बडीशेप पावडर, गरम मसाला आणि सुंठ पावडर घालून मिक्स करा.

या गोष्टी लक्षात ठेवा

यात एका ताराचे पाक तयार होईपर्यंत हे शिजवा. एक तार पाक तयार होताच गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे लोणचे काचेच्या बाटलीत ठेवा. तुमचे जास्त काळ टिकणारे कैरीचे आंबट गोड लोणचे तयार आहे.