मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Evening Snacks साठी परफेक्ट आहे पनीर शेझवान टोस्ट, काही मिनिटांत तयार होते ही रेसिपी

Evening Snacks साठी परफेक्ट आहे पनीर शेझवान टोस्ट, काही मिनिटांत तयार होते ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 05, 2023 04:57 PM IST

Easy and Quick Snacks Recipe: जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत आणि टेस्टी खायचे असेल तर पनीर शेझवान टोस्ट बनवा. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि खूप लवकर तयार होतो.

पनीर शेझवान टोस्ट
पनीर शेझवान टोस्ट

Paneer Schezwan Cheese Toast Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काही चविष्ट आणि जंक फूड खावेसे वाटते. अशावेळी बाहेरून काही मागवण्यापेक्षा झटपट घरीच स्नॅक्स तयार करा. आज आम्ही सांगत आहोत टेस्टी पनीर शेझवान टोस्टची रेसिपी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बनवायला फक्त काही मिनिटे लागतात आणि टेस्टी क्रिस्पी टोस्ट तयार आहे. तसेच पनीरच्या मदतीने तुम्ही ते हेल्दी सुद्धा बनवू शकता. म्हणून जेव्हा मुले संध्याकाळी काहीतरी चवदार खाण्याचा आग्रह करतात तेव्हा पनीर शेझवान टोस्ट बनवा आणि काही मिनिटांत त्यांना खायला द्या.

पनीर शेझवान टोस्ट बनवण्यासाठी साहित्य

- ३-४ ब्रेड

- १ चमचा शेझवान चटणी

- मेयोनीज

- १ कांदा बारीक चिरलेला

- हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

- शिमला मिरची बारीक चिरलेली

- पनीरचे तुकडे

- किसलेले चीज

- मिक्स हर्ब्स

- बटर

पनीर शेझवान टोस्ट बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी कोथिंबिर, सिमला मिरची घ्या. आता त्यात शेझवान चटणी आणि मेयोनीज घाला. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चिली फ्लेक्स देखील घालू शकता. हे सर्व चांगले मिक्स करा. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स टाळा. सर्वात शेवटी पनीरचे चौकोनी तुकडे त्यात मिक्स करा. आता ब्रेड घ्या. ब्रेडवर बटरचा नीट थर लावा. जेणेकरून ब्रेडवर बटरचा संपूर्ण थर लावला जाईल. त्यावर पनीर आणि शेझवान यांचे मिश्रण लावा. वर किसलेले चीज ठेवा आणि त्यावर मिक्स हर्ब्स शिंपडा. ओव्हन ३०० अंशांवर सेट करा आणि ८-१० मिनिटे शिजवा. 

ओव्हन नसेल तर नॉनस्टिक पॅन गरम करून बटर लावा. नंतर ब्रेड तव्यावर ठेवून मंद आचेवर भाजून घ्या. या दरम्यान हवे असल्यास झाकणाने झाकून ठेवा. याने चीज चांगले वितळेल आणि ब्रेड खालून कुरकुरीत राहील. तुमची पनीर शेझवान टोस्ट तयार आहे.

WhatsApp channel

विभाग