मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makhana Dosa: मखाना पासून झटपट बनवा टेस्टी डोसा, नाश्त्यासाठी आहे परफेक्ट रेसिपी

Makhana Dosa: मखाना पासून झटपट बनवा टेस्टी डोसा, नाश्त्यासाठी आहे परफेक्ट रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 04, 2023 10:53 AM IST

Recipe for Breakfast: तसं तर डोसा उडीद डाळ आणि तांदळाच्या पेस्टपासून बनवला जातो. पण तुम्ही इंस्टंट मखाना डोसा तयार करू शकता. कसे ते जाणून घ्या.

इस्टंट मखाना डोसा
इस्टंट मखाना डोसा (pexels)

Makhana Dosa Recipe: मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅकचा विचार केला जातो तेव्हा मखाना खाण्याची शिफारस केली जाते. मखाना खीर तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल. पण तुम्हाला माहित आहे का की मखानापासून चविष्ट डोसा देखील तयार केला जाऊ शकतो. मखाना डोसा हा एक इंस्टंट डोसा आहे जो त्वरित भूक भागवू शकतो. ते कसे बनवायचे ते येथे पहा-

मखाना डोसा बनवण्यासाठी साहित्य

- मखाना - १ कप

- रवा - १ कप

- पोहे - १/२ कप

- दही - १ कप

- मीठ

- इनो - १ टीस्पून

- पाणी - १ कप

मखाना डोसा बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी मखाना, पोहे, रवा आणि दही एकत्र करून घ्या. त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून किमान ३० मिनिटे बाजूला ठेवा. आता ही पेस्ट मिक्सरमध्ये टाका आणि नीट मिसळा. ब्लेंड करताना तुम्ही मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. नंतर एका भांड्यात पेस्ट काढून त्यात इनो मिक्स करा. एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि हे तयार केलेले पीठ त्यावर डोसा बनवण्यासाठी पसरवा. तेल टाकून नीट भाजून घ्या. तुमचा टेस्टी मखाना डोसा तयार आहे. नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग