मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Watermelon Bhaji: टरबूजचे साल फेकू नका, बनवा टेस्टी भाजी, पाहा शेफ कुणालची ही समर स्पेशल रेसिपी

Watermelon Bhaji: टरबूजचे साल फेकू नका, बनवा टेस्टी भाजी, पाहा शेफ कुणालची ही समर स्पेशल रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 05, 2023 12:15 PM IST

Recipe by Chef Kunal Kapur: उन्हाळ्यात टरबूत आवडीने खाल्ले जाते. टरबू खाल्ल्यानंतर त्याचे साल फेकू नका तर त्यापासून टेस्टी भाजी बनवा. शेफ कुणाल कपूरची ही सोपी रेसिपी पाहा.

टरबूजच्या सालाची भाजी
टरबूजच्या सालाची भाजी

Watermelon Peel Sabzi or Bhaji Recipe: उन्हाळा सुरू होताच तुम्ही टरबूज अनेक वेळा खाल्लं असेल. फ्रूट चाट असो वा टरबूज शेक शरीराला थंड ठेवण्यासाठी तुम्ही टरबूजचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले असतील. टरबूज केवळ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करत नाही तर उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने पोटदुखी, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. सहसा लोक टरबूज खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतात. तुम्हीही असं केलंत तर पुढच्या वेळी असे करू नका. शेफ कुणाल कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून एक रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीमध्ये कुणाल टरबूजाच्या सालापासून चविष्ट भाजी कशी बनवता येते हे सांगत आहे. चला तर मग जाणून घेऊया टरबूजाच्या सालापासून बनवलेल्या भाजीची ही टेस्टी रेसिपी.

टरबूजच्या सालाची भाजी बनवण्यासाठी साहित्य

- ५ चमचे मोहरीचे तेल

- अर्धा टीस्पून हिंग

- ३ सुक्या लाल मिरच्या

- १ टीस्पून मोहरी

- २ टीस्पून बडीशेप

- १ टीस्पून जिरे

- अर्धा टीस्पून कलौंजी

- १ टीस्पून चिरलेले आले

- १ टीस्पून चिरलेला लसूण

- १ टीस्पून चिरलेला कांदा

- ३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- चवीनुसार मीठ

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून लाल तिखट

- १ टीस्पून धने पावडर

- ३ कप टरबूजाची साल

- १ टीस्पून आमचूर पावडर

- १ टीस्पून कसुरी मेथी

- १ टीस्पून कोथिंबीर

टरबूजाच्या सालाची भाजी बनवण्याची पद्धत

टरबूजाच्या सालाची भाजी बनवण्यासाठी प्रथम टरबूजाचे साल काढून त्याचे छोटे तुकडे करून वेगळे ठेवा. यानंतर कढईत ५ टेबलस्पून मोहरीचे तेल टाकून गरम करा. आता तेलात हिंग, सुकी लाल मिरची, मोहरी, बडीशेप, जिरे, कलौंजी, चिरलेला लसूण घाला. लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडा वेळ शिजवा. यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, मीठ, हळद, तिखट आणि धने पूड घालून चांगले मिक्स करा. आता यानंतर कढईत टरबूजाचे तुकडे टाका आणि मसाल्यांसोबत चांगले शिजवा. आता त्यात टरबूजाचा रस घालून मंद आचेवर शिजवा. 

भाजी शिजल्यानंतर त्यात आमचूर पावडर, चाट मसाला आणि १ चमचा कसुरी मेथी घाला. तुमची टेस्टी टरबूजच्या सालाची भाजी तयार आहे. गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel