मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rice Flour Paratha: डिनरमध्ये बनवा तांदळाच्या पीठाचे पराठे, बटाट्याच्या भाजीसोबत लागते टेस्टी

Rice Flour Paratha: डिनरमध्ये बनवा तांदळाच्या पीठाचे पराठे, बटाट्याच्या भाजीसोबत लागते टेस्टी

Jun 05, 2023, 08:54 PM IST

    • Paratha in Dinner: जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात गव्हाचे पीठाच्या पोळी आणि पुरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तांदळाच्या पिठाचे पराठे बनवा. या रेसिपीने हे पराठे बनवल्यास ते एकदम मऊ होतील.
तांदळाच्या पीठाचे पराठे (freepik)

Paratha in Dinner: जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात गव्हाचे पीठाच्या पोळी आणि पुरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तांदळाच्या पिठाचे पराठे बनवा. या रेसिपीने हे पराठे बनवल्यास ते एकदम मऊ होतील.

    • Paratha in Dinner: जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात गव्हाचे पीठाच्या पोळी आणि पुरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तांदळाच्या पिठाचे पराठे बनवा. या रेसिपीने हे पराठे बनवल्यास ते एकदम मऊ होतील.

Rice Flour Paratha Recipe: रोज रात्री जेवायला काय बनवयाचे हा मोठा प्रश्न असतो. शिवाय तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा देखील येतो. आपल्या रोजच्या जेवणात आपण बनवलेल्या बहुतेक भाज्या वेगवेगळ्या असतात, पण पोळी किंवा पराठा हा नेहमी गव्हाचा बनतो. मुलं काही वेगळं मागत असतील तर त्यांना तांदळाच्या पिठाचा पराठा खायला द्या. या रेसिपीने हे पराठे बनवल्यास ते एकदम मऊ होतील. तसेच त्यांची चव पूर्णपणे भिन्न असेल.

ट्रेंडिंग न्यूज

How To Identify Real Kesar: बाजारात विकलं जाणारं केशर असली की नकली? कसं ओळखाल? ‘या’ गोष्टी नक्की तपासा

World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी या गोष्टींपासून राहावे दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ वाढवणार नाही समस्या

Joke of the day : पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छरांच्या त्रासानं हैराण होतो…

Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

तांदळाच्या पीठाचे पराठे बनवण्यासाठी साहित्य

- २ वाट्या तांदळाचे पीठ

- २ वाट्या पाणी

- लसूण-आले पेस्ट १ चमचा

- ठेचलेली लाल मिरची १ चमचा

- कसुरी मेथी दीड टीस्पून

- कोथिंबीर

- तेल २ ते ३ चमचे

- मीठ चवीनुसार.

तांदळाच्या पीठाचे पराठे बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी ठेवून ते गरम होऊ द्या. गरम होत असतानाच त्यात सर्व मसाले टाका. कसुरी मेथी, चिली फ्लेक्स, मीठ घाला. सोबत कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट आणि तेल घाला. आता या गरम पाण्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाचे पीठ पाण्यात जाताच पाणी शोषून घेते. ते चांगले मिसळून, सुमारे दोन मिनिटे शिजवा. नंतर गॅस बंद करून दोन मिनिटे झाकून ठेवा. दोन मिनिटांनंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि एका प्लेन सरफेस असणाऱ्या वाटीने ते नीट दाबून घ्या. हाताला तेल लावून थोडे थंड झाल्यावर पीठ मळून घ्या. थोडे कोरडे पीठ लावून पोळी लाटून घ्या आणि तूप लावून तव्यावर भाजून घ्या. तुमचे चविष्ट तांदळाच्या पिठाचे पराठे तयार आहेत. गरमा गरम बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा.

विभाग