मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raw Mango Pickle: झटपट बनवा कैरीचे लोणचे, मिनिटात तयार होईल ही रेसिपी

Raw Mango Pickle: झटपट बनवा कैरीचे लोणचे, मिनिटात तयार होईल ही रेसिपी

May 23, 2023, 01:37 PM IST

    • Instant Raw Mango Pickle: लोणचे बनवायला खूप वेळ लागतो. पण कैरीचे इंस्टंट लोणचे तयार करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? या इंस्टंट लोणच्याची रेसिपी येथे जाणून घ्या.
कैरीचे इंस्टंट लोणचे

Instant Raw Mango Pickle: लोणचे बनवायला खूप वेळ लागतो. पण कैरीचे इंस्टंट लोणचे तयार करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? या इंस्टंट लोणच्याची रेसिपी येथे जाणून घ्या.

    • Instant Raw Mango Pickle: लोणचे बनवायला खूप वेळ लागतो. पण कैरीचे इंस्टंट लोणचे तयार करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? या इंस्टंट लोणच्याची रेसिपी येथे जाणून घ्या.

Raw Mango Instant Pickle Recipe: वरण भात असो किंवा साधा पराठा असो, आंब्याचे लोणचे प्रत्येक गोष्टीत अप्रतिम लागते. तसं तर ऑथेंटिक लोणचे बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते झटपट तयार करू शकता. उन्हाळ्यात जेव्हा कधी लोणचे खावेसे वाटेल तेव्हा लगेच कैरी घ्या आणि इथे सांगितल्याप्रमाणे लोणचे बनवा. हे लोणचे तुम्ही २ ते ३ दिवस साठवून ठेवू शकता. इंस्टंट कैरीचे लोणचे बनवण्याची रेसिपी पहा.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

इंस्टंट कैरीचे लोणचे बनवण्यासाठी लागेल....

- कच्ची कैरी

- मोहरी

- मेथी दाणे

- हिंग

- हळद

- लाल तिखट

- मीठ

- मोहरीचे तेल

कसे बनवावे

इंस्टंट लोणचे बनवण्यासाठी कैरी घ्या आणि ते चांगला धुवून कापून घ्या. नंतर मेथी आणि मोहरी कोरडी भाजून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ सोबत मोहरी आणि मेथीदाणे चांगले मिसळा. आता त्यात गरम तेल घाला. नंतर चांगले मिक्स करा. आता त्यात चिरलेली कैरी घाला आणि मिक्स करा जेणेकरून कैरीला मसाला नीट लागेल. तुमचे लोणचे तयार आहे. एका बरणीत ठेवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. काही तासांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्याची चव चांगली येईल. जर तुम्हाला २-३ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवायचे असेल तर तुम्ही बरणीमध्ये थोडे अधिक तेल टाकू शकता.

विभाग