
Apple Iced Tea Recipe: दिवसभराच्या थकव्यानंतर एक कप चहा प्यायल्यानंतर ताजेतवाने वाटते. पण उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. अशा परिस्थितीत, केवळ थकवा दूर करण्यासाठीच नाही तर मूड आणि चव दोन्ही फ्रेश करण्यासाठी तुम्ही घरी रेस्टॉरंटसारखा ॲपल आइस टी सहज बनवू शकता. ॲपल आइस टी केवळ चवीलाच चांगला नाही तर झटपट तयारही होतो. विशेष म्हणजे हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट समर ड्रिंक मानले जाते. हा टेस्टी आणि हेल्दी ॲपल आईस टी कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
- सफरचंदाचा रस
- लिंबाचा रस
- पुदीना
- पाणी
- मध
- बर्फ
ॲपल आइस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. लक्षात ठेवा पाणी फक्त गरम करायचे आहे, उकळायचे नाही. पाण्याला उकळी येण्यापूर्वी गॅस बंद करा आणि त्यात चहापत्ती (चहा पावडर) टाका. गरम पाण्यात ती तळाशी बसण्यासाठी ३ मिनीट तसेच राहू द्या. आता हे पाणी गाळणी किंवा टी फिल्टरने गाळून थंड होण्यासाठी ठेवून द्या. हे पाणी थंड झाल्यानंतर यात आता लिंबूचा रस आणि मध मिक्स करा. मधाचा वापर तुम्ही इच्छेनुसार करू शकता. कारण सफरचंदाच्या रसात एक गोडवा असतो. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तरच मध मिक्स करा. तुम्ही हे स्किप देखील करू शकता. आता एका जार मध्ये सफरचंदाचा रस, लिंबाचे तुकडे, बर्फाचे तुकडे, सफरचंदाचे पातळ काप आणि ठेचलेली पुदिन्याची पाने सुद्धा टाका. आता हे सर्व एका सर्व्हिंग ग्लासमध्ये टाका आणि लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा. तुमची थंडगार ॲपल आइस टी तयार आहे.
संबंधित बातम्या
