Corn Chaat: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी बनवा क्रीमी कॉर्न चाट, नोट करा ही चटपटीत रेसिपी-how to make creamy corn chaat recipe at home ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Corn Chaat: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी बनवा क्रीमी कॉर्न चाट, नोट करा ही चटपटीत रेसिपी

Corn Chaat: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी बनवा क्रीमी कॉर्न चाट, नोट करा ही चटपटीत रेसिपी

May 21, 2023 05:23 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचे मन करते असेल तर तुम्ही कॉर्न चाटची ही खास रेसिपी ट्राय करू शकता. टेस्टी असण्यासोबतच ही रेसिपी हेल्दी सुद्धा आहे.

क्रीमी कॉर्न चाट
क्रीमी कॉर्न चाट

Creamy Corn Chaat Recipe: कधी-कधी हेल्दी खाण्याचा कंटाळा येतो आणि तुम्ही काहीतरी चटपटीत खाण्याचा विचार करून तळलेले स्नॅक्स खाता. पण असे एक चाट आहे जे हेल्दी असण्यासोबतच तुम्ही चटपटीत खाण्याचे क्रेविंग सुद्धा शांत करु शकते. होय, ही रेसिपी म्हणजे क्रीमी कॉर्न चाट आहे. या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या देखील घालू शकता. या रेसिपीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती लवकर तयार होते. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या कसे बनवावे क्रीमी कॉर्न चाट.

क्रीमी कॉर्न चाट बनवण्यासाठी साहित्य

- १ कप उकडलेले कॉर्न

- ५ चेरी टोमॅटो

- १ स्लाइस लिंबू

- १ टेबलस्पून लाल तिखट

- २ चमचे सेव

- २ चमचे चिरलेली कोथिंबीर

- १/२ कप चिरलेली लाल सिमला मिरची

- १/२ टीस्पून चिली फ्लेक्स

- १ टेबलस्पून बटर

- २ चमचे लसूण मेयोनीज

- मीठ

क्रीमी कॉर्न चाट बनवण्याची पद्धत

क्रीमी कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करा. नंतर त्यात लाल शिमला मिरची टाका. मध्यम आचेवर साधारण १ मिनीट भाजा. आता कॉर्न टाका एक मिनिट परतून घ्या. आता लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाका. नीट मिक्स करा. हे मिश्रण आता एका बाऊल मध्ये काढून घ्या. चेरी टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, शेव आणि लसूण मेयोनेजनी गार्निश करा. टॉस करा आणि सर्व्ह करा. तुम्ही ही रेसिपीमध्ये बटर ऐवजी ऑलिव्ह ऑइल सुद्धा वापरू शकता. तसेच तुमच्या आवडीच्या इतरही भाज्या बारीक चिरून टाकू शकता.

Whats_app_banner
विभाग