मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rava Fries Recipe: रेगुलर फ्रेंच फ्राईजपेक्षा बनवा रवा फ्राईज! बघा रेसिपीचा Video

Rava Fries Recipe: रेगुलर फ्रेंच फ्राईजपेक्षा बनवा रवा फ्राईज! बघा रेसिपीचा Video

May 06, 2023, 07:46 AM IST

    • Snacks Recipe: बटाट्यापासून बनवलेले फ्राईज अनेकांना आवडतात. पण या रेगुलर फ्राईजपेक्षा तुम्ही रव्यापासून फ्राईज बनवू शकता.
रवा फ्राईज (@iamtarneet / Instagram )

Snacks Recipe: बटाट्यापासून बनवलेले फ्राईज अनेकांना आवडतात. पण या रेगुलर फ्राईजपेक्षा तुम्ही रव्यापासून फ्राईज बनवू शकता.

    • Snacks Recipe: बटाट्यापासून बनवलेले फ्राईज अनेकांना आवडतात. पण या रेगुलर फ्राईजपेक्षा तुम्ही रव्यापासून फ्राईज बनवू शकता.

Sooji Fries Video Recipe: फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहानपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना आवडतात. फ्राईज बटाट्यापासून बनवले जातात. पण तुम्ही रव्यापासूनही फ्राईज बनवू शकता. रवा फ्राईजची ही अतिशय सोपी आणि अतिशय चवदार रेसिपी ट्राय करून पहा. यासाठी तुम्हाला जास्त साहित्य किंवा जास्त वेळ लागणार नाही. रवा फ्राईज बनवण्याची रेसिपी इंस्टाग्राम यूजर @iamtarneet ने त्याच्या अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

International No Diet Day: का साजरा केला जातो इंटरनॅशनल नो डाएट डे, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Mango Storage Tips: पिकलेले आंबे होणार नाही लवकर खराब, फक्त साठवताना लक्षात ठेवा या गोष्टी

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवेल थंडगार जलजीरा, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

Health Care Tips: ही फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आरोग्याला पोहोचते हानी, जाणून घ्या याचे कारण

लागणारे साहित्य

१ कप पाणी, १ कप रवा, १ चमचा ओवा, १ टीस्पून चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तेल आणि १ कप तेल तळण्यासाठी. चला आता जाणून घेऊया रवा फ्राईज बनवण्याची सोपी पद्धत.

Jawari Upma Recipe: वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो ज्वारीचा उपमा! नोट करा रेसिपी

कसे बनवायचे फ्राईज?

> प्रथम एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यात रवा, मीठ, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका आणि काही मिनिटे शिजवा. हे मिश्रण घट्ट होईल असे दिसले की या मिश्रणात १ चमचा तेल टाकून चांगले मिसळा.

> नंतर हे पीठ एका भांड्यात काढून ठेवावे. आता ते सपाट करून मोठा गोळा बनवा.

> नंतर हे पीठ बटर पेपरवर ठेवा आणि दुसऱ्या बटर पेपरने झाकून जाड चपाती लाटून घ्या.

> आता त्याचे फ्राईजसारख्या आकारात कापून तळून घ्या.

> स्वादिष्ट रवा फ्राईज तयार आहेत. सॉसबरोबर सर्व्ह करा.

विभाग