मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Egg Curry Recipe: लंचमध्ये बनवा झणझणीत अंडा करी, ट्राय करा ही कोल्हापुरी रेसिपी

Egg Curry Recipe: लंचमध्ये बनवा झणझणीत अंडा करी, ट्राय करा ही कोल्हापुरी रेसिपी

May 28, 2023, 11:55 AM IST

    • Spicy Anda Curry Recipe: रविवारच्या दिवशी अंडा करी बनवायचा विचार करत असाल तर ही कोल्हापुरी रेसिपी ट्राय करू शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
कोल्हापुरी अंडा करी

Spicy Anda Curry Recipe: रविवारच्या दिवशी अंडा करी बनवायचा विचार करत असाल तर ही कोल्हापुरी रेसिपी ट्राय करू शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.

    • Spicy Anda Curry Recipe: रविवारच्या दिवशी अंडा करी बनवायचा विचार करत असाल तर ही कोल्हापुरी रेसिपी ट्राय करू शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.

Kolhapuri Egg Curry Recipe: तुम्ही आजपर्यंत अंडी करी बनवण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या असतील. पण कोल्हापुरी एग करी ही बाकीच्या अंडा करीच्या रेसिपींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि चवदार आहे. ही अंडा करी रेसिपी स्पायसी आणि खायला चविष्ट आहे. ज्याची चव लहानांपासून मोठ्यांना आवडते. चला तर मग जाणून घेऊया कोल्हापुरी अंडा करी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

कोल्हापुरी अंडा करी बनवण्यासाठी साहित्य

- ४ अंडी

- १ कांदा

- १ टोमॅटो

- १ टीस्पून गरम मसाला

- १ टीस्पून हळद

- मीठ चवीनुसार

- १ कप मोहरीचे तेल

- गार्निशिंगसाठी - १/२ कप किसलेले खोबरे

कोल्हापुरी अंडा करी बनवण्याची पद्धत

कोल्हापुरी अंडा करी बनवण्यासाठी प्रथम उकडलेले अंडे सोलून त्यावर मीठ आणि हळद भुरभुरावी आणि तेलात हलके तळून घेतल्यावर वेगळ्या ताटात काढून घ्या. त्यानंतर दुसरे पॅन घ्या. त्यात थोडे तेल टाकून त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून भाजून घ्या. थंड झाल्यावर ग्राइंडरमध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक करून पेस्ट बनवा. आता हे कांदा-टोमॅटो पेस्ट एका पॅनमध्ये ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा. आता पॅनमध्ये गरम मसाला, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण काही मिनिटे शिजवा, जेणेकरून मसाल्यांचा कच्चा वास निघून जाईल. 

यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि तळलेले अंडे पॅनमध्ये टाका आणि आणखी एक मिनिट शिजवा. आता त्यावर किसलेल्या खोबऱ्याने सजवा. तुमची कोल्हापुरी अंडा करी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

विभाग