मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Kaju: स्पायसी क्रंची काजू चवीला असतात अप्रतिम, घरी तयार करणे आहे सोपे

Masala Kaju: स्पायसी क्रंची काजू चवीला असतात अप्रतिम, घरी तयार करणे आहे सोपे

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 27, 2023 06:14 PM IST

Tea Time Snacks: बाजारात मिळणाऱ्या स्नॅक्समध्ये कुरकुरे काजू खूप आवडीने खाल्ले जातात. घरच्या घरी बनवायचे असेल तर फक्त काही गोष्टी लागतील आणि कुरकुरीत काजू काही मिनिटांत तयार होतील.

मसाला काजू
मसाला काजू

Masala Roasted Cashew Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काही हेल्दी स्नॅक्स घेणे ही चांगली सवय आहे. अनेकदा लोकांना कुरकुरीत मसालेदार काजू खायला आवडतात. बाजारात उपलब्ध असलेल्या या स्नॅक्सची चव अप्रतिम आहे. या मसाल्याच्या काजूची चव अशी आहे की कोणीही खाण्यास नकार देणार नाही. जर तुम्हाला अशाच टेस्टचे काजू घरच्या घरी तयार करायचे असतील तर फक्त या गोष्टी लागतील. आणि काही मिनिटांत मसालेदार कुरकुरीत काजू तयार होतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते बनवण्याची पद्धत.

मसाला काजू बनवण्यासाठी साहित्य

- १०० ग्राम काजू

- २-३ चमचे ऑलिव्ह ऑईल किंवा देशी तूप

- १ टीस्पून लाल तिखट

- अर्धा टीस्पून चाट मसाला

- १ टीस्पून मीठ

- १ टीस्पून भाजलेले जिरे पावडर

- अर्धा टीस्पून आमचूर पावडर

मसाला काजू बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका भांड्यात सर्व काजू घ्या. त्यावर वितळलेले ऑलिव्ह ऑईल किंवा देसी तूप घाला. आता ते चांगले टॉस करा. सर्व काजूंवर लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर, जिरेपूड, चाट मसाला घालून मिक्स करा. सर्व काजू एका बेकिंग ट्रेवर पसरवा आणि ३०० डिग्री सेल्सिअसवर ८-१० मिनिटे बेक करा. चविष्ट मसालेदार कुरकुरीत काजू तयार आहेत. संध्याकाळच्या चहासोबत त्याचा आनंद घ्या.

WhatsApp channel

विभाग