Chilli Pickle: जेवणाची चव वाढवेल हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे, मिनिटांत तयार होते रेसिपी-how to make instant green chilli pickle recipe at home ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chilli Pickle: जेवणाची चव वाढवेल हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे, मिनिटांत तयार होते रेसिपी

Chilli Pickle: जेवणाची चव वाढवेल हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे, मिनिटांत तयार होते रेसिपी

May 27, 2023 01:09 PM IST

Instant Pickle Recipe: साधारणपणे कोणतेही लोणचे पूर्णपणे तयार होण्यास थोडा वेळ लागतो. पण आज आम्ही हिरव्या मिरचीच्या लोणचीची जी रेसिपी शेअर करणार आहे, ती झटपट तयार होते.

हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे
हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे

Instant Green Chilli Pickle Recipe: लोक उन्हाळ्यात भूक न लागण्याची तक्रार अनेकदा करतात. अशा परिस्थितीत जेवणाच्या ताटात जेवणासोबत दिलेले हिरव्या मिरचीचे लोणचे तुमची तक्रार तर दूर करतेच पण तुमच्या जेवणाची चवही वाढवते. सहसा कोणतेही लोणचे पूर्णपणे तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आज आम्ही तुमच्यासोबत जी हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहोत ती झटपट तयार गोते. चला तर मग जाणून घेऊया इंस्टंट हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे.

हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्राम चिरलेली हिरवी मिरची

- २ टेबलस्पून मेथी

- २ चमचे मोहरी

- २ टीस्पून बडीशेप

- २ टेबलस्पून संपूर्ण धणे

- २ टीस्पून जिरे

- १ टेबलस्पून मीठ

- १/२ छोटा टीस्पून हळद

- २ टीस्पून आमचूर पावडर

- १/२ कप गरम केलेले मोहरीचे तेल

- काळे मीठ चवीनुसार

इस्टंट हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्याची पद्धत

हिरव्या मिरचीचे इंस्टंट लोणचे बनवण्यासाठी प्रथम हिरवी मिरची धुवून त्याचे पाणी चांगले स्वच्छ करा. यानंतर हिरव्या मिरचीच्या मध्यभागी एक चीर देऊन त्याचे तुकडे करा. यानंतर एका कढईत मध्यम आचेवर मेथी, मोहरी, बडीशेप, जिरे, धने टाका आणि १-२ मिनिटे कोरडे भाजून घ्या. आता हा कोरडा भाजलेला मसाला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये चिरलेली हिरवी मिरची, बारीक केलेला कोरडा मसाला, हळद, काळे मीठ, साधे मीठ आणि आमचूर पावडर घालून सर्व काही चांगले मिक्स करावे.

आता शेवटी ताटात ठेवलेल्या मिरच्यांवर गरम मोहरीचे तेल टाका आणि पुन्हा एकदा मिरच्या मसाल्यात चांगले मिक्स करा. तुमचे चविष्ट इंस्टंट हिरव्या मिरचीचे लोणचे तयार आहे. तुम्ही ते काचेच्या बरणीत भरून काही दिवस साठवून ठेवू शकता.

विभाग