मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडतील टेस्टी चिकन पॉपकॉर्न, नोट करा रेसिपी

नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडतील टेस्टी चिकन पॉपकॉर्न, नोट करा रेसिपी

Mar 16, 2023, 06:35 PM IST

    • Nonveg Recipe: तुम्हालाही नॉनव्हेज खायला आवडत असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करा. खायला टेस्टी असणारे हे चिकन पॉपकॉर्न बनवायलाही सोपे आहे.
चिकन पॉपकॉर्न

Nonveg Recipe: तुम्हालाही नॉनव्हेज खायला आवडत असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करा. खायला टेस्टी असणारे हे चिकन पॉपकॉर्न बनवायलाही सोपे आहे.

    • Nonveg Recipe: तुम्हालाही नॉनव्हेज खायला आवडत असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करा. खायला टेस्टी असणारे हे चिकन पॉपकॉर्न बनवायलाही सोपे आहे.

Chicken Popcorn Recipe: संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स मध्ये चटपटीत पदार्थ खायला आवडतात. नॉनव्हेज खाण्याची आवड असणारे व्यक्ती तर विविध पदार्थ शोधतच असतात. तुम्ही सुद्धा नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी ट्राय करा. चिकन पॉपकॉर्नची ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. तुम्ही हे स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व्ह करु शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

Yoga Mantra: सततच्या स्ट्रेसमुळे आरोग्यावर होतो विपरीत परिणाम, टेन्शन फ्री राहण्यासाठी करा ही योगासनं

Travel Tips: कुटूंबासोबत चित्रकूट फिरण्याचे करू शकता प्लॅनिंग, भेट देण्यासाठी हे आहेत बेस्ट ठिकाणं

चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य

- चिकन - ५०० ग्रॅम

- कॉर्नफ्लोअर - २ छोटे चमचे

- ब्रेड पावडर - १/२ कप

- आले पेस्ट - १/२ टीस्पून

- लिंबाचा रस - १/२ टीस्पून

- लसूण पेस्ट - १/२ टीस्पून

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- हळद - १ टीस्पून

- गरम मसाला - १/२ टीस्पून

- तेल - १ कप

- मीठ - चवीनुसार

चिकन पॉपकॉर्न बनवण्याची पद्धत

चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी प्रथम सर्व मसाले एका भांड्यात टाका आणि चांगले मिक्स करा. आता या मिश्रणात ब्रेड पावडर, कॉर्नफ्लोअर घाला. यानंतर चिकन पूर्णपणे स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करून या मिश्रणात मिक्स करा. आता एका कढईत तेल गरम करा. या मिश्रणात चिकन बुडवून ते तेलात टाका. सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. तुमचे चविष्ट चिकन पॉपकॉर्न तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

विभाग