मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: फ्लॉलेस स्किनसाठी अशा प्रकारे लावा नारळातील मलई, गमावलेली चमक मिळेल परत

Skin Care: फ्लॉलेस स्किनसाठी अशा प्रकारे लावा नारळातील मलई, गमावलेली चमक मिळेल परत

Mar 19, 2023, 01:45 PM IST

    • Coconut Malai for Flawless Skin: ग्लोइंग आणि फ्लॉलेस त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर नारळाची मलई वापरू शकता. ते कसे लावायचे ते येथे जाणून घ्या.
स्किन केअर टिप्स (unsplash)

Coconut Malai for Flawless Skin: ग्लोइंग आणि फ्लॉलेस त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर नारळाची मलई वापरू शकता. ते कसे लावायचे ते येथे जाणून घ्या.

    • Coconut Malai for Flawless Skin: ग्लोइंग आणि फ्लॉलेस त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर नारळाची मलई वापरू शकता. ते कसे लावायचे ते येथे जाणून घ्या.

Skin Care With Coconut Malai: नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच ते त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यासोबत त्याची मलई देखील सौंदर्य वाढवण्याचे काम करते. निर्दोष आणि चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे याचा वापर करू शकता. चेहऱ्यावर नारळाची मलई कशी वापरायची ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Travel Tips: कुटूंबासोबत चित्रकूट फिरण्याचे करू शकता प्लॅनिंग, भेट देण्यासाठी हे आहेत बेस्ट ठिकाणं

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

अशी लावा मलई

नारळाची मलई लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रथम ते ब्लेंडरमध्ये टाका आणि नंतर चांगले बारीक करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि नंतर काही वेळ राहू द्या. सुमारे १० मिनिटांनंतर चेहऱ्याला चांगले मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

फेस पॅक

कोकोनट क्रीम सनबर्न, जळजळ दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याच्या मदतीने तुम्ही फेस पॅकही तयार करू शकता. ज्यामुळे चेहरा नितळ होईल. यासाठी मलई ब्लेंड करा आणि नंतर त्यात थोडे गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल टाकून चांदले मिक्स करा. हे चेहऱ्याला लावा. साधारण १५ ते २० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

स्क्रब करा

चेहरा किंवा शरीरावरील डेड स्किन काढण्यासाठी तुम्ही नारळाच्या मलईने स्क्रब देखील तयार करू शकता. यासाठी नारळाच्या मलईमध्ये ओट्स किंवा कॉफी मिक्स करता येते. या दोन्ही गोष्टी नीट मिसळल्यानंतर चेहऱ्याला आणि शरीराला हलक्या हातांनी मसाज करा. असे केल्याने टॅनिंगसह डेड स्किनपासून सुटका होईल

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग