मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Health: व्हाईट डिस्चार्जच्या समस्येने त्रस्त? सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील या औषधी वनस्पती

Women Health: व्हाईट डिस्चार्जच्या समस्येने त्रस्त? सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील या औषधी वनस्पती

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2023 09:58 PM IST

Home Remedies: तसं तर व्हाईट डिस्चार्ज पिरियड्सप्रमाणेच सामान्य असले तरी काही महिलांना पांढऱ्या पाण्याची समस्या जास्त असते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

व्हाईट डिस्चार्जच्या समस्येसाठी घरगुती उपाय
व्हाईट डिस्चार्जच्या समस्येसाठी घरगुती उपाय (HT)

Natural Remedies for White Discharge: महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी एक म्हणजे व्हाईट डिस्चार्ज आहे. तसे तर पांढरे पाणी पीरियड्ससारखे सामान्य आहे. परंतु हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की तुम्हाला स्त्राव कसा आहे. काही स्त्रियांमध्ये ते खूप जास्त असते. काहींमध्ये दुर्गंधी आणि खाज सुटते. तज्ञांच्या मते हा एक आजार नाही, परंतु तरीही तो मधुमेहासह अनेक रोगांच्या विकासास कारणीभूत ठरतो. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही काही नैसर्गिक घटक वापरू शकता.

१. लोध्र

लोध्र (symplocos racemosa) ही एक अत्यंत शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते, जी स्त्रियांमधील विविध हार्मोनल समस्यांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला पांढर्‍या स्रावाचा त्रास होत असेल तर लोध्राच्या झाडाची साल पाण्यात उकळून चहा म्हणून प्यावी.

२. अशोक

अनियमित मासिक पाळी आणि असामान्य पांढरा स्त्राव यासह महिलांच्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी अशोकाचा वापर केला जाऊ शकतो. अशोक वनस्पतीची साल एक ग्लास पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्या. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे पाणी वेजाइनल वॉश सारखे वापरू शकता.

३. गुळवेल

गुळवेल किंवा गुडूची मध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी एजिंग गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. गुळवेल वनस्पतीचे स्टेम पाण्यात उकळता येते. हे पाणी व्हाईट डिस्चार्जचा हेल्दी फ्लो राखण्यासाठी योनिमार्ग धुण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

४. त्रिफळा

याच्या मदतीने आपण घरी इंटिमेट वॉश बनवू शकता. यासाठी २० ग्रॅम त्रिफळा घेऊन अर्धा लिटर पाण्यात उकळा. एक चतुर्थांश पाणी उरले की गॅस बंद करा, आणि ते गाळून थंड होऊ द्या. एकदा ते थंड झाल्यावर योनी धुण्यासाठी वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग